शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या गायीने दिला वासराला जन्म, भूकेने झाली व्याकुळ; ट्रेकिंग ग्रुपने दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 19:38 IST

गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या एका गायीने रात्रीत वासराला जन्म दिला, पण डोंगरावर तिला पुरेसे खायला मिळाले नसल्याने भूकेने व्याकूळ होऊन ती अर्धमेल्या अवस्थेत पडून राहिली.

सांगली : गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या एका गायीने रात्रीत वासराला जन्म दिला, पण डोंगरावर तिला पुरेसे खायला मिळाले नसल्याने भूकेने व्याकूळ होऊन ती अर्धमेल्या अवस्थेत पडून राहिली. पहाटे ट्रेकिंगला आलेल्या एका ग्रुपला हे निदर्शनास येताच त्यांनी सच्ची गोसेवा करीत त्या गाय वासरास चारा-पाणी खायला घालत त्यांच्या मालकापर्यंतही पोहचविले.सिध्देवाडी येथील दंडोबा डोंगराच्या परिसरात आसपासचे पशुपालक जनावरे हिंडवण्यासाठी जात असतात. त्यांच्याच कळपातील एक गाय गर्भावस्थेतील वेदना सुरू झाल्याने एका झाडाखाली थांबली. रात्रीत वासराला जन्म दिल्याने वेदना व भुकेने व्याकूळपणे रात्रभर एकाठिकाणीच उभी होती. मदतीची चिन्हे दिसत नसल्याने कावरीबावरीही झाली होती.पहाटे मिरजेतील आरंभ ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते.यावेळी या ग्रुपच्या सदस्यांना गाय अर्धमेल्या अवस्थेत पडून असल्याचे दिसले. त्यांनी आपल्या जवळील खाद्यपदार्थ गाईला खायला दिले, पण एवढ्याने तिची भूक भागणार नव्हती. त्यामुळे सदस्यांनी डोंगरावर भटकून चारा गोळा करून तिला खायला दिला. त्यानंतर तिला डोंगरावर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या डबक्यापर्यंत आणले व तिची तहानही भागविली. डोंगरावरील अन्य प्राण्यांपासून गायी व वासराचे संरक्षण करण्यासाठी काही सदस्य त्यांच्या जवळ थांबले व काहीजण डोंगर उतरुन आसपासच्या शेतकऱ्यांना भेटून पशुपालक असणाऱ्या मालकाशी संपर्क साधला व त्यांना गायी व वासराची माहिती दिली. अखेर मालकापर्यंत ही दोन्ही जनावरे पोहच केल्यानंतर या सदस्यांनी डोंगर सोडले.त्यांच्या या प्राणीप्रेमाने शेतकरीही भारावून गेले. ग्रुपचे सदस्य असलेले संतोष कुलकर्णी, उमेश माळी, अमोल आगळगावे, अविनाश खोबरे, सागर मगदुम, गणेश ईसापुरे, अक्षय आगळगावे या सर्वांना शेतकऱ्याने धन्यवाद दिले.

टॅग्स :Sangliसांगलीcowगाय