सावळवाडी येथून केबल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:31+5:302021-05-13T04:27:31+5:30
सांगली : सावळवाडी (ता. मिरज) येथे शेतास पाणी देण्यासाठी नदीवर बसविलेल्या मोटारीची केबल अज्ञाताने चोरून नेली. याप्रकरणी नरेंद्र आण्णासाहेब ...

सावळवाडी येथून केबल लंपास
सांगली : सावळवाडी (ता. मिरज) येथे शेतास पाणी देण्यासाठी नदीवर बसविलेल्या मोटारीची केबल अज्ञाताने चोरून नेली. याप्रकरणी नरेंद्र आण्णासाहेब लांडे (रा. शिवाजीनगर, मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी लांडे यांची सावळवाडी येथे शेती असून, शेताला पाणी देण्यासाठी वारणा नदीवर त्यांनी मोटार बसविली आहे. रविवार(दि. ९) अज्ञाताने पाच हजार रुपये किमतीची २७० फूट केबल चोरून नेली. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
---------
सांगलीतून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील गवळी गल्ली परिसरातून अज्ञाताने दुचाकी लंपास केली. याप्रकरणी संजय अनंत पोतदार (रा. सरकार तालीमजवळ, गवळी गल्ली, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोमवारी( दि. १०) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.