शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Sangli: कुटुंब रंगले मुलीच्या विवाहात..चोरट्यांनी २८ लाख ५० हजाराचा ऐवज केला लंपास

By घनशाम नवाथे | Updated: February 8, 2024 11:30 IST

सांगली : येथील कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीतील व्यापारी विनोद श्रीचंद खत्री (वय ४४) यांचा बंद बंगला फोडून चोरट्याने रोख ...

सांगली : येथील कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीतील व्यापारी विनोद श्रीचंद खत्री (वय ४४) यांचा बंद बंगला फोडून चोरट्याने रोख २० लाख आणि सोन्याचे दागिने असा २८ लाख ५२ हजार रूपयाचा ऐवज लंपास केला. खत्री कुटुंबिय मुलीच्या विवाहासाठी गेले असता चोरट्याने तिजोरी साफ केली. तत्पूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कट केल्यामुळे माहितगार व्यक्तीने चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्यापारी विनोद खत्री यांचे सांगलीत मारूती रस्त्यावर शोरूम आहे. खत्री यांच्या मुलीचा विवाह असल्यामुळे सांगलीतील बंगल्यातील धार्मिक कार्यक्रम आटोपून सर्वजण सोमवारी दुपारी ४ वाजता कोल्हापूर येथे गेले. त्यानंतर चोरट्याने रात्रीच्या सुमारास बंगल्याच्या मागील बाजूस प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची माहिती असल्यामुळे त्याने तेथील वायरिंग कट केले. त्यानंतर पाठीमागील दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश केला.आतमध्ये आल्यानंतर बेडरूममधील तिजोरी फोडून आतील रोख २० लाख रूपये, सोन्याचे दागिने असा ऐवज घेतला. बंगल्यातील सर्व खोल्यामध्ये जाऊन साहित्य विस्कटून चोरट्याने रोकड व दागिने शोधले. चोरट्याचा बंगल्यात बराच काळ मुक्काम होता. रोकड व साहित्य घेऊन चोरट पळून गेला. मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास खत्री कुटुंबिय सांगलीत आले. मुख्य दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा आतील साहित्य विस्कटून टाकल्याचे पाहून धक्का बसला. चोरट्यांनी बेडरूममधील तिजोरी फोडून रोकड व दागिने लांबवले. त्यांनी तत्काळ सांगली शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.ठसे तज्ज्ञांना व श्वान पथकाला पाचारण केेले. श्वान परिसरातच घुटमळल्यामुळे चोरट्यांचा माग कळाला नाही. नूतन पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक महादेव पोवार आदींनी घटनास्थळी पाहणी केली.

सीसीटीव्ही फुटेज हातीचोरट्याने एका सीसीटीव्हीची वायर कापली असली तरी परिसरातील अन्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यादृष्टीने फुटेज तपासून शोध सुरू आहे.

पथके रवानाचोरट्याचा माग काढण्यासाठी सांगली शहर पोलिस ठाण्याकडील तसेच गुन्हे अन्वेषणचे पथक रवाना करण्यात आले आहे.

‘बंगल्याची माहिती असणाऱ्याने चोरी केल्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. चोरटा लवकरच पकडला जाईल. -संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस