शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

हद्दपारीचा भंग करून तिघे गुन्हेगार सांगलीत, शहर पोलिसांनी केली तात्काळ कारवाई

By घनशाम नवाथे | Updated: March 11, 2024 17:53 IST

सांगली : हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून जिल्ह्यात प्रवेश केलेल्या अभिषेक दिपक कुंटे (वय २०, रा. बुरुड गल्ली, सांगली ), ...

सांगली : हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून जिल्ह्यात प्रवेश केलेल्या अभिषेक दिपक कुंटे (वय २०, रा. बुरुड गल्ली, सांगली), करण किशोर ओगानिया (वय १९, रा. गवळी गल्ली, सांगली), समीर रजमान नदाफ (वय ४०, रा. शंभर फुटी, नुरानी मशिदनजीक, गल्ली क्र.२, सांगली) या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली.अधिक माहिती अशी, अभिषेक दिपक कुंटे (वय २०, रा. बुरुड गल्ली, सांगली ) या गुन्हेगारास दि. २० जुलै २०२३ रोजी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केले आहे. मात्र कोणतीही परवानगी न घेता अभिषेक हा आदेशाचा भंग करून कर्नाळ रस्त्यावरील झेंडा चौकात थांबल्याचे दिसताच त्याला ताब्यात घेतले.तसेच कृष्णानदीकाठावर डॉ. वसंतदादा पाटील यांचे समाधी स्थळाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ मध्यरात्री दिडच्या सुमारास हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून आलेल्या करण किशोर ओगानिया (वय १९, रा. गवळी गल्ली, सांगली ) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दि. १८ जानेवारी २०२३ रोजी दोन वर्षाकरिता हद्दपार केलेल्या समीर रजमान नदाफ (वय ४०, रा. शंभर फुटी, नुरानी मशिदनजीक, गल्ली क्र.२, सांगली ) शंभर फुटी रस्त्यावर सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक महादेव पोवार आणि पथकाने ही कारवाई केली.

तिघेही सराईत गुन्हेगारहद्दपारीचा भंग केल्याबद्दल शहर पोलिसांनी अटक केलेले तिघेही गुन्हेगार सराईत आहेत. ते विना परवाना शहरात आले होते. पोलिसांनी वेळीच त्यांच्यावर कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस