वाढदिवसाचा खर्च टाळून रस्त्याकडेची झुडपे काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST2021-01-04T04:22:49+5:302021-01-04T04:22:49+5:30

उमदी येथील सर्वसामान्य कुटुंबातील सुरेश पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उमदी ते विठ्ठलवाडी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे काढून रस्ता ...

The bushes along the road were removed to avoid the expense of birthdays | वाढदिवसाचा खर्च टाळून रस्त्याकडेची झुडपे काढली

वाढदिवसाचा खर्च टाळून रस्त्याकडेची झुडपे काढली

उमदी येथील सर्वसामान्य कुटुंबातील सुरेश पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उमदी ते विठ्ठलवाडी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे काढून रस्ता खुला केला. हा रस्ता काटेरी झुडपामुळे झाकलेला होता. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत होते. अनेकवेळा रस्त्याकडेला असलेली काटेरी झुडपे काढण्याबाबत संबंधित विभागाकडे नागरिकांनी मागणीही केली होती. तरीदेखील कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे वाढदिवसानिमित्त बॅनर अथवा पार्टीसाठी होणारा खर्च सुरेश पवार यांनी रस्त्यालगतची काटेरी झुडपे काढून सामाजिक बांधीलकी जपली.

यावेळी मलकारसिद्ध देवस्थान गदगी पुजारी, उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, काँग्रेस नेते निवृत्ती शिंदे, उपसरपंच रमेश हाळके, सुनील पोतदार, अनिल शिंदे, बंडा शेवाळे, संतोष आरकेरी, दावल शेख, आदी उपस्थित होते.

फोटो-०३उमदी१

Web Title: The bushes along the road were removed to avoid the expense of birthdays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.