इस्लामपुरात शिवसैनिकांकडून राणेंच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:41+5:302021-08-25T04:31:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरणारे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा येथे ...

Burning of Rane statue by Shiv Sainiks in Islampur | इस्लामपुरात शिवसैनिकांकडून राणेंच्या पुतळ्याचे दहन

इस्लामपुरात शिवसैनिकांकडून राणेंच्या पुतळ्याचे दहन

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरणारे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा येथे शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. या वेळी शिवसैनिकांनी राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारत दहन केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल राणे यांनी अनुद्गार काढल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या वेळी पवार म्हणाले, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम डोळ्यांत खुपत असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्याच्या नादात नारायण राणे माथेफिरूसारखी वक्तव्ये करीत आहेत. शिवसेना कडवट शिवसैनिकांची फौज आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर देऊ.

तालुुकाप्रमुख सागर मलगुंडे, शहरप्रमुख नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार, वर्षा निकम, राजेंद्र पवार, राजेंद्र पाटील, कमलेश शहा, ओंकार देशमुख, प्रताप खराडे, सचिन कुचीवाले, प्रमोद जाधव, योगेश हुबाले, महेश जाधव, संग्राम साळुंखे आदी उपस्थित होते.

Web Title: Burning of Rane statue by Shiv Sainiks in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.