ऐतवडे खुर्द येथे तीन झोपड्या जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:06+5:302021-02-05T07:21:06+5:30
ऐतवडे खुर्द येथील भैरवनाथ मंदिराच्या शेजारीच विजापूर जिल्ह्य़ातील काही लोक पाईपलाईन खुदाई कामासाठी दहा ते पंधरा वर्षांपासून वास्तव्यास ...

ऐतवडे खुर्द येथे तीन झोपड्या जळून खाक
ऐतवडे खुर्द येथील भैरवनाथ मंदिराच्या शेजारीच विजापूर जिल्ह्य़ातील काही लोक पाईपलाईन खुदाई कामासाठी दहा ते पंधरा वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ग्रामपंचायतीने येथे त्यांना जागा दिली होती. सध्या या ठिकाणी बारा झोपड्या आहेत. शंभर लोक येथे वास्तव्यास आहेत. त्यापैकी वसंत भीमसिंग नाईक, कुमार सुभाष राठोड व अण्णाराय खेमू राठोड हे बुधवारी कामाला गेले होते. झोपड्यांजवळ लहान मुले खेळत असताना अचानक झोपड्यांना आग लागल्याने परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. तीन झोपड्यांना आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. भैरवनाथ मंडळाचे युवक व समर्थ एज्युकेशनच्या विद्यार्थिनींनी ही आग आटोक्यात आणली.
आग नेमकी कशाने लागली, हे समजू शकले नाही. लहान मुले रस्त्यावर खेळत असल्याने मोठा अनर्थ टळला.
चाैकट
चाैकशीची मागणी
मागील आठवड्यात अशीच एका झोपडीला आग लागून पन्नास हजारांचे नुकसान झाले होते. त्या कुटुंबाला परिसरातील नागरिक मदत करून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, तोपर्यंतच बुधवारी शेजारील झोपड्यांना आग लागल्याने प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.