पांढरेवाडी येथे घरफोडी; अठरा तोळे सोने लंपास

By Admin | Updated: June 19, 2014 00:57 IST2014-06-19T00:53:09+5:302014-06-19T00:57:50+5:30

घराच्या दरवाजा आणि लोखंडी ग्रीलची दोन कुलपे तोडली

Burglary at Whitewadi; Eighteen Tola Gold Lampas | पांढरेवाडी येथे घरफोडी; अठरा तोळे सोने लंपास

पांढरेवाडी येथे घरफोडी; अठरा तोळे सोने लंपास

आटपाडी : पांढरेवाडी (ता. आटपाडी) येथील लक्ष्मण नारायण जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सहा लाखांचा ऐवज लंपास केला. काल, मंगळवारी रात्री घराच्या दरवाजा आणि लोखंडी ग्रीलची दोन कुलपे तोडून चोरट्यांनी ही घरफोडी केली.
लक्ष्मण जाधव यांचे पांढरेवाडी गावात आणि मळ््यातही घर आहे. शेतकामावेळी ते गावातील घराऐवजी शेतातील घरात सहकुटुंब राहतात. सध्या शेतात कामे सुरू असून, त्यांचे कुटुंबीय केवळ गावातील घरी झाडलोट करून स्वच्छता करण्यासाठी येतात.
काल सायंकाळी सहा वाजता जाधव यांच्या पत्नी मनीषा आणि आई कस्तुराबाई यांनी गावातील घराची
झाडलोट करून घराच्या दरवाजाला आणि दरवाजासमोरील लोखंडी ग्रीलला कुलपे लावली होती. रात्री चोरट्यांनी ही दोन्ही कुलपे तोडून घरात प्रवेश करून सूटकेसमध्ये ठेवलेली तीनपदरी सोन्याची मोहनमाळ, खरबुज्या मणी असलेली पाच तोळ्यांची माळ, पाच तोळ्यांची साखळी, पदक असलेले गंठण, दोन सोन्याच्या पाच तोळे वजनाच्या पाटल्या (बांगड्या), एक तीन ग्रॅम वजनाची आणि एक दोन ग्रॅम वजनाची अशा दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, सोन्याची कर्णफुले असा ऐवज लंपास केला. आज (बुधवारी) दुपारी बाराच्या सुमारास लक्ष्मण जाधव यांच्या नात्यातील महादेव विठोबा जाधव यांनी दूरध्वनी करून दुपारी घरातील कोणी स्वच्छतेसाठी आले आहे काय, घराचे दरवाजे
उघडे कसे आहेत, अशी विचारणा केली. तेव्हा जाधव यांनी तातडीने घर गाठले. त्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. आटपाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, फौजदार अजित पाटील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Burglary at Whitewadi; Eighteen Tola Gold Lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.