सांगलीत दोन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:29 IST2021-02-24T04:29:30+5:302021-02-24T04:29:30+5:30

सांगली : शहरातील सर्वधर्म चौक आणि नुराणी मज्जिद परिसरातील दोन घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी २८ हजाराची रोकड, चार तोळे ...

Burglary at two places in Sangli | सांगलीत दोन ठिकाणी घरफोडी

सांगलीत दोन ठिकाणी घरफोडी

सांगली : शहरातील सर्वधर्म चौक आणि नुराणी मज्जिद परिसरातील दोन घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी २८ हजाराची रोकड, चार तोळे सोन्याच्या बांगड्या, पैंजण, लहान मुलाच्या मनगट्या असा ऐवज चोरुन नेला आहे. या दोन्ही घटना सोमवारी उघडकीस आल्या. याप्रकरणी शहर पोलिसांत नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शंभरफुटी रस्त्यालगतच्या नुराणी मज्जिद नजीकच्या तिसऱ्या गल्लीत राहणाऱ्या रहिना अब्दुल चाबुकस्वार यांच्या घरातून चोरट्यांनी २५ हजाराची रोकड, ७ हजाराचे किमतीचे पैंजण, ८ हजाराच्या लहान मुलाच्या अर्ध्या तोळ्याच्या मनगट्या चोरुन नेल्या आहेत, तर सर्वधर्म चौकातील भिलावे खानावळीनजीक राहणाऱ्या शैयनाज साबीब मुल्ला यांच्या घरातून ३ हजाराची रोकड, २० हजाराच्या चार तोळे सोन्याच्या बांगड्या असा ऐवज चोरुन नेला आहे. या दोन्ही घटनांची नोंद घेऊन शहर पोलिसांनी सुमारे ६३ हजाराचा ऐवज चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

...

Web Title: Burglary at two places in Sangli