कुपवाडमध्ये घरफोडीतील संशयितास २४ तासात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:47+5:302021-09-03T04:27:47+5:30
कुपवाड : शहरातील दत्तात्रय मारुती साळुंखे (सध्या रा. हनुमाननगर, कुपवाड) यांचे बंद घर फोडून चोरट्याने तिजोरीत ठेवलेले ७६ हजार ...

कुपवाडमध्ये घरफोडीतील संशयितास २४ तासात अटक
कुपवाड : शहरातील दत्तात्रय मारुती साळुंखे (सध्या रा. हनुमाननगर, कुपवाड) यांचे बंद घर फोडून चोरट्याने तिजोरीत ठेवलेले ७६ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी २४ तासाच्या आत संशयितास मुद्देमालासह अटक केली. वैभव बसवेश्वर सन्नके (वय १९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, कुपवाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
साळुंखे सोमवारी रात्री घराला कुलूप लावून कामावर गेले होते, तर त्यांची पत्नी माहेरी गेली होती. त्यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्याने घर फोडून तिजोरीत ठेवलेली सोन्याची साखळी, नेकलेस, अंगठी, बदाम असा ७६ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी तातडीने संशयितास ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याचा २४ तासाच्या आत छडा लावून संशयितास मुद्देमालासह अटक केली. संशयित वैभव सन्नके याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली.