शिराळ्यातील घरफाेडी आठ लाखाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:25 IST2021-03-28T04:25:50+5:302021-03-28T04:25:50+5:30

शिराळा : येथील गुरुवार पेठेतील सुधीर विश्वासराव जाधव यांच्या घरातील चोरी आठ लाखाची असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. बावीस तोळे ...

The burglary in Shirala is worth Rs 8 lakh | शिराळ्यातील घरफाेडी आठ लाखाची

शिराळ्यातील घरफाेडी आठ लाखाची

शिराळा : येथील गुरुवार पेठेतील सुधीर विश्वासराव जाधव यांच्या घरातील चोरी आठ लाखाची असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. बावीस तोळे सोने, चांदी तसेच रोख पन्नास हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत शनिवारी माया जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. रात्री उशिरा श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

येथील मुख्य बाजारपेठेत सुधीर जाधव यांचे घर आहे. काही दिवसांपासून ते इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यामुळे घर बंद होते. दि. २७ रोजी जाधव यांना डिस्चार्ज मिळणार असल्याने त्यांच्या पत्नी माया शुक्रवारी सायंकाळी पैसे नेण्यासाठी घरी आल्या. यावेळी त्यांना घरातील तिजोरी उघडी दिसली. कपाटातील ५० हजार रुपये व दागिने जागेवर नसल्याचे दिसले. मात्र, सुधीर जाधव रुग्णालयात असल्याने नेमके काय चोरीस गेले आहे, याचा तपशील त्यांना देता आला नाही. शनिवारी ते घरी आल्यावर आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

चोरीची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. रात्री उशिरा श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

Web Title: The burglary in Shirala is worth Rs 8 lakh