सांगलीत साडेसहा लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST2021-09-12T04:31:32+5:302021-09-12T04:31:32+5:30

सांगली : शहरातील जामवाडी परिसरात बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा सहा लाख ६० हजार ...

Burglary of Rs | सांगलीत साडेसहा लाखांची घरफोडी

सांगलीत साडेसहा लाखांची घरफोडी

सांगली : शहरातील जामवाडी परिसरात बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा सहा लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मच्छिंद्र शामराव गरंडे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडल्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी गरंडे यांचा हातगाडीचा व्यवसाय असून ते जयसिंगपूर येथे राहण्यास आहेत, तर दुसरा भाऊ दागिने तपासणीच्या व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे राहण्यास आहे. त्यामुळे गरंडे यांच्या आई एकट्या जामवाडी येथील घरात राहतात. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास त्या कोल्हापूरला मुलाकडे गेल्या होत्या. या कालावधीत घरी कोणीही नव्हते. नेमकी याचीच संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश करत बारा हजाराची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने अशा सहा लाख ६० हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला.

शनिवारी सकाळी हा चोरीचा प्रकार समोर आला. त्यानंतर गरंडे यांनी सांगलीत येत शहर पोलिसात फिर्याद दिली. सहायक निरीक्षक धनाजी पाटील यांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: Burglary of Rs