सव्वातीन लाख रुपयांची सुभाष नगरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST2021-07-29T04:27:34+5:302021-07-29T04:27:34+5:30

मिरज : मिरजेतील सुभाष नगर येथे बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपये रोख रकमेसह सव्वादोन ...

A burglary of Rs | सव्वातीन लाख रुपयांची सुभाष नगरात घरफोडी

सव्वातीन लाख रुपयांची सुभाष नगरात घरफोडी

मिरज : मिरजेतील सुभाष नगर येथे बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपये रोख रकमेसह सव्वादोन लाखांचे पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. बुधवारी दुपारी बारा वाजता ही चाेरी झाली. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत उत्तम यल्लाप्पा नाईक (वय ४०) यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

उत्तम नाईक हे सुभाषनगर ब गटात वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळी ते घराला कुलूप लावून कामानिमित्त मिरजेत गेले होते. दुपारी १२ वाजता ते घरी परतले असता, घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात पाहणी केली असता, तिजोरीचा दरवाजा ताेडल्याचे दिसले. तिजाेरीतील एक लाख रोख रक्कम, दोन लाख वीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व ब्रेसलेट असे पाच तोळे साेन्याचे दागिने असा सव्वातीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे दिसले. याबाबत उत्तम नाईक यांनी फिर्याद दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुभाषनगर परिसरात वारंवार चोऱ्यांचे प्रकार सुरू आहेत. भरदिवसा चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

Web Title: A burglary of Rs