शिराळा : रेड ( ता.शिराळा) येथील शिक्षक आनंदराव राजाराम पाटील यांचे भरचौकातील घर फोडून १३ तोळे सोन्याचे दागिने व रोख दोन लाख रुपयांची रोकड असा सहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सोमवार पहाटे ही घटना उघडकीस आली. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
घराच्या मुख्य दरवाज्याचे तसेच आतील चार दरवाज्याची कुलूपे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. लोखंडी तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून त्यातील औषधोपचारा साठी आणलेले दोन लाख रुपये तसेच आनंदराव यांच्या मृत आई लक्ष्मी यांच्या सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, वज्र टिक, कोल्हापुरी डोरले आदी अंदाजे सात तोळ्याचे तसेच पत्नी मनीषा यांच्या पाटल्या , बांगड्या , कानातील झुमके, लहान मंगळसूत्र आदी अंदाजे सहा तोळे अशे सर्व मिळून तेरा तोळे सोन्याचे दागिने या अज्ञात चोरून नेले आहेत.