वानलेसवाडीत भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:33+5:302021-09-06T04:29:33+5:30
सांगली : शहरातील वानलेसवाडी येथील श्रीरामनगर परिसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी रोख ३० हजार रुपयांसह सोन्या-चांदीची दागिने असा दोन ...

वानलेसवाडीत भरदिवसा घरफोडी
सांगली : शहरातील वानलेसवाडी येथील श्रीरामनगर परिसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी रोख ३० हजार रुपयांसह सोन्या-चांदीची दागिने असा दोन लाख ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी दादासाहेब यल्लाप्पा मंजलकर (वय ६०, रा.कचरनाथ हौसिंग सोसायटी, रामनगर गल्ली क्र. ११, वानलेसवाडी) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. शुक्रवार दि. ३ रोजी दिवसा हा चोरीचा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी फिर्यादी मंजलकर हे मुलीच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी जयसिंगपूरला कुटुंबीयांसह गेले होते. या कालावधीत घरी कोणीही नव्हते. नेमके याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला व बेडरूममध्ये असलेल्या फर्निचरच्या शोकेस कपाटात असलेले रोख ३० हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. मंजलकर कुटुंबीय शुक्रवारी सायंकाळी परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर, त्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली. भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडल्याने, पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. पोलिसांनी तीन साक्षीदार तपासत रेकॉर्डवरील तीन संशयितांकडे तपास सुरू केला आहे.