शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बैलांना बॅटरीचा शॉक, लाठ्यांनी मारहाण; शर्यतींमधील छळसत्र सुरूच; तासगाव तालुक्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 12:15 IST

परवानगीलाच दिला जातोय फाटा

सांगली : न्यायालयाच्या निर्बंधानंतरही बैलगाडी शर्यतींमध्ये गैरप्रकार सुरूच आहेत. परवानगीशिवाय शर्यतींचे प्रमाणही वाढले असून त्याकडे महसूल प्रशासन आणि पोलिसांचा कानाडोळा दिसत आहे.तासगाव आणि पलूस तालुक्यात शनिवारी व रविवारी झालेल्या शर्यतींत सर्रास गैरप्रकार दिसून आले. बैलांना बॅटरीचे शॉक देणे, काठीने मारहाण करणे, शेपटी पिरगाळणे, टोचणे असे गैरप्रकार सुरू होते. या शर्यतींना पोलिसांची किंवा प्रशासनाची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. शर्यतीत बैलांचा छळ होत असल्याच्या कारणास्तव प्राणीमित्रांनी सर्वोच्च न्यायालयात शर्यतींना आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने निर्बंध लादले. मनाईवर फेरविचार करताना काही अटी व शर्तींसह शर्यतींना परवानगी देण्यात आली. संपूर्ण शर्यत कायदेशीर अटींचे पालन करून पार पाडण्याचे आदेश देण्यात आले. पण या अटींचे पुरेपूर पालन होत नसल्याचे दिसत आहे.पलूस आणि तासगाव तालुक्यांतील या शर्यतींमध्येही बैलांना काठीने मारहाण, बॅटरीचा शॉक देणे असे प्रकार घडले. यामुळे प्राणीमित्रांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परवानगीलाच दिला जातोय फाटाशर्यतीसाठी अनामत रक्कम कमी करूनही परवानगी घेण्याची काळजी संयोजक घेत नाहीत. वाढदिवस, जयंती-पुण्यतिथीच्या निमित्ताने शर्यत घेता येणार नाही, असेही आदेश आहेत, तरीही शर्यती घेतल्या जात आहेत. सध्या तर अनेक गावांत परवानगी न घेताच मैदान भरवले जात आहे. परवानगी घेतल्यास पोलिस बंदोबस्त लागू होतो, शर्यतीच्या अंतरावर निर्बंध येतात, शर्यतीपूर्वी बैलांची आरोग्य तपासणी करावी लागते. हे सारे टाळण्यासाठी परवानगीलाच फाटा देण्यात येत आहे.

टॅग्स :SangliसांगलीBull Cart Raceबैलगाडी शर्यत