शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

‘ते’ तीन कोटी कोल्हापूरच्या बिल्डरचे

By admin | Updated: March 17, 2016 00:46 IST

चोरीची फिर्याद दाखल : चोरीचा छडा लावताना वारणानगरमध्ये पोलिसांना सापडले आणखी सव्वा कोटी

कोल्हापूर : वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मधून एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये बुधवारी कोडोली पोलिसांनी जप्त केले. मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये सापडलेली तीन कोटींची रोकडही याच इमारतीमधून चोरीस गेली होती. सुमारे सव्वाचार कोटींची बेहिशेबी रक्कम वारणानगर (ता. पन्हाळा) येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. मैनुद्दिन मुल्ला याच्या घरात सापडलेली रक्कम कुणाची याची चर्चा गेली चार दिवस सुरू असताना त्यावर मालकी सांगायला कोणच तयार नव्हते. अचानक मंगळवारी रात्री कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंझारराव सरनोबत यांनी कोडोली पोलिसांत फिर्याद दिल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील हे आपले साडू आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षक कॉलनीमधील बिल्डिंगमध्ये आपण जमिनीच्या व्यवहारासाठी आणलेले सुमारे तीन कोटी ११ लाख रुपये ठेवले होते. त्या रकमेची चोरी झाल्याची फिर्याद कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक व मल्टी डेव्हलपर्सचे मालक झुंझार माधवराव सरनोबत (वय ४६, रा. शिवाजी पेठ) यांनी मंगळवारी रात्री कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वारणा समूहाचे नेते व माजी आमदार विनय कोरे हे या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असले तरी संस्थेचा सर्व व्यवहार सचिव जी. डी. पाटील हेच पाहतात. सांगली पोलिसांनी मिरज बेथेलहेमनगरमधून मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा) याच्या घरातून तीन कोटी सात लाख ६३ हजार रुपये १२ मार्चला जप्त केले. त्याने सुरुवातीला ही रक्कम कर्नाटकातील एका शिक्षण संस्थेशी संबंधित खासदाराची हवालामधील असल्याचे सांगितले होते. परंतु पोलिस तपासात त्यात फारसे तथ्य आढळले नाही. म्हणून इतकी मोठी रक्कम आली कुठून याबाबत मुल्ला याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नं. ५ मधून साथीदार रेहान अन्सारी याच्या मदतीने चोरल्याची कबुली दिल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. सांगलीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ धनवट यांनी मंगळवारी मैनुद्दीन याला वारणानगर परिसरात फिरविले. जेथून रोकड लंपास केली, त्या शिक्षक कॉलनीच्या बिल्डिंगमधील फ्लॅट नं. ३ ची पाहणी केली असता तिजोरीमध्ये आणखी काही रक्कम असल्याचे दिसून आले. झुंझार सरनोबत यांनी कोडोली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत वारणा शिक्षण मंडळाच्या कॅम्पसमधील शिक्षक कॉलनी बिल्डींग नं. ५ मध्ये जमिनीच्या व्यवहारासाठी आणून ठेवलेली रक्कम ३ कोटी ११ लाख रुपये चोरीस गेल्याचे म्हटले आहे. पैसे मोजायला लागले तीन तासवारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंगला ५ ला मंगळवारी दुपारपासून सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवला होता. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद मेमाणे, ठसेतज्ज्ञ जी. एस. पाटील, बँक आॅफ इंडिया शाखेचे अधिकारी विजय पत्रावळे व विजय कांबळे, सरकारी पंच असा फौजफाटा आला. तिजोरीतील पैशांचा पंचनामा करून ते मशिनद्वारे मोजले असता एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये मिळून आले. ते मोजण्यास तीन तास लागले.शिक्षण मंडळाचे सचिव चौकशीच्या फेऱ्यातवारणा शिक्षक कॉलनीमधील इमारतीमध्ये सापडलेल्या बेहिशेबी रकमेसंदर्भात शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील, बांधकाम व्यावसायिक झुंझार सरनोबत यांच्या चौकशीसह सहा महिन्यांतील मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले जाणार आहेत. ही रक्कम सरनोबत यांनी आणली कुठून त्याची सखोल चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, सचिव जी. डी. पाटील यांची कोलोली (ता. पन्हाळा) येथे शिक्षणसंस्था आहे, तसेच त्यांचा निवृत्ती कॉलनी, वारणानगर येथे बंगला आहे. या दोन्ही ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी चौकशी केल्याचे समजते. शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील व बांधकाम व्यावसायिक सरनोबत हे नातेवाईक आहेत. संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला हा सचिव पाटील यांच्या मुलाच्या गाडीवर काही दिवस चालक होता, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणी सचिव पाटील, त्यांचा मुलगा, बांधकाम व्यावसायिक सरनोबत यांची चौकशी करून त्यांचे व आरोपीचे सहा महिन्यांतील मोबाईल कॉल डिटेल्सही तपासले जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. शिक्षण मंडळाचे सचिव चौकशीच्या फेऱ्यातवारणा शिक्षक कॉलनीमधील इमारतीमध्ये सापडलेल्या बेहिशेबी रकमेसंदर्भात शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील, बांधकाम व्यावसायिक झुंझार सरनोबत यांच्या चौकशीसह सहा महिन्यांतील मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले जाणार आहेत. ही रक्कम सरनोबत यांनी आणली कुठून त्याची सखोल चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, सचिव जी. डी. पाटील यांची कोलोली (ता. पन्हाळा) येथे शिक्षणसंस्था आहे, तसेच त्यांचा निवृत्ती कॉलनी, वारणानगर येथे बंगला आहे. या दोन्ही ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी चौकशी केल्याचे समजते. शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील व बांधकाम व्यावसायिक सरनोबत हे नातेवाईक आहेत. संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला हा सचिव पाटील यांच्या मुलाच्या गाडीवर काही दिवस चालक होता, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणी सचिव पाटील, त्यांचा मुलगा, बांधकाम व्यावसायिक सरनोबत यांची चौकशी करून त्यांचे व आरोपीचे सहा महिन्यांतील मोबाईल कॉल डिटेल्सही तपासले जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील व झुंझार सरनोबत हे नातेवाईक असून त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांचा भागीदारीमध्ये व्यवसाय असल्याने शिक्षण संकुलातील इमारतीमधील रुम वापरण्यास दिली ही आमची चूक आहे. या प्रकरणाची समितीतर्फे चौकशी करू, या पैशाचा वारणा उद्योग समूहाशी काडीमात्र संबंध नाही.- विनय कोरे, अध्यक्ष, वारणा शिक्षण मंडळ वारणा शिक्षक कॉलनी इमारतीमध्ये बेहिशेबी रकमेची फिर्यादी व पंचांच्या समक्ष मोजणी केली आहे. ती १ कोटी ३१ लाख २९ हजार रुपये आहे. फिर्यादी सरनोबत यांनी ही रक्कम स्वत:ची असून जमिनीच्या व्यवहारासाठी नातेवाईकांच्याकडे ठेवल्याचे सांगितले आहे. व्हीडिओ चित्रीकरणाद्वारे हा पंचनामा केला आहे. जप्त रक्कम प्राप्तिकर खात्याच्या ताब्यात देणार आहोत. - सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक (शाहूवाडी विभाग) रक्कम चार महिन्यांपासून इमारतीतमिरज पोलिसांनी संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला याच्या घरातून जप्त केले तीन कोटी १७ लाख रुपये आणि बुधवारी सापडलेले आणखी १ कोटी ३१ लाख २९ हजार रुपये असे सुमारे सव्वाचार कोटी रुपये गेल्या चार महिन्यांपासून वारणा शिक्षक कॉलनीमधील या इमारतीमध्ये ठेवली होती. पहिल्या मजल्यावर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य व प्राध्यापक राहतात. दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. ३ मध्ये रक्कम ठेवली होती. जादा रकमेची चर्चा कोट्यवधी रुपये असल्याचे वृत्त वारणानगर परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी सकाळपासून गर्दी केली. सशस्त्र पोलिस बंदोबस्तात वारणा शिक्षक कॉलनीमधील बिल्डिंगमध्ये पोलिस अधिकारी व बँकेचे अधिकारी रक्कम मोजत होते. नेमके किती पैसे आहेत, याची हुरहूर आणि उत्कंठा सर्वांनाच लागली होती. सुरुवातीस २० कोटींची त्यानंतर ८ कोटींची चर्चा सकाळपासून सोशल मीडियावरून पुढे येत होती. तब्बत तीन तासांनी या बिल्डिंगमध्ये सुमारे सव्वाचार कोटींचे घबाड गेल्या चार महिन्यांपासून ठेवल्याचे निष्पन्न होताच सर्वच अवाक् झाले. बॅगेत जागा नसल्याने मोहिद्दीनने सोडली रक्कमसांगली : मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये सापडलेले ‘ते’ तीन कोटींचे घबाड कोल्हापुरातील बिल्डर झुंजारराव माधवराव सरनोबत (वय ४६) यांचे असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. वारणानगर येथील विभाग शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील बिल्डिंग क्रमांक ५ मध्ये बिल्डर झुंजारराव सरनोबत यांचे साडू आशुतोष पाटील यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातून मोहिद्दीनने दि. ७ व ८ मार्चच्या दरम्यान मोहिद्दीन याने एका परप्रांतीय साथीदाराच्या मदतीने या कार्यालयाचे कुलूप तोडून लॉकरमधील ही तीन कोटी सात लाख ६३ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबविली. त्यावेळी बॅगेमध्ये जागा नसल्याने लॉकरमधील आणखी असलेली रक्कम तेथेच सोडून दिली होती. ती एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये इतकी असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. सरनोबत हे बाहेरगावी जाणार असल्याने त्यांनी २८ फेब्रुवारी रोजी ३ कोटी १० लाख रुपये पाटील यांच्याकडे ठेवण्यास दिले होते. पुढील खरेदी-विक्री व्यवहारासाठी ही रक्कम वापरली जाणार होती. पाटील यांनी कार्यालयातील आतील लॉकरमध्ये ही रक्कम ठेवली होती. त्यानंतर आशुतोष पाटीलही बाहेरगावी गेले होते. दि. ७ व ८ मार्चच्या दरम्यान मोहिद्दीन याने एका परप्रांतीय साथीदाराच्या मदतीने या कार्यालयाचे कुलूप तोडून लॉकरमधील ही तीन कोटी ७ लाख ६३ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबविली. या चोरीची सरनोबत व पाटील यांना माहिती नसल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. मंगळवारी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक विश्वनाथ घनवट व त्यांच्या पथकाने मोहिद्दीन याला चोरीच्या ठिकाणी नेले, तेव्हा या चोरीचा उलगडा झाला. त्यानंतर सरनोबत यांनी कोडोली पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली. संशयित मोहिद्दीन याचे मूळ गाव जाखले आहे. या गावापासून कोडोलीतील शिक्षक कॉलनी दोन किलोमीटर अंतरावर आहे. मोहिद्दीन हा वाहनचालक आहे. तो बदली चालक म्हणून अनेकांकडे काम करतो. त्यातून शिक्षक कॉलनीतही तो ये-जा करीत असे. कॉलनीची संपूर्ण माहिती त्याला आहे. कोणत्या कार्यालयात कोणते व्यवहार होतात, याचीही माहिती त्याला आहे, असे निरीक्षक घनवट यांनी सांगितले.या चोरीत त्याला मदत करणाऱ्या परप्रांतीय साथीदाराचेही नाव निष्पन्न झाले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक सुनील फुलारी, अप्पर पोलिस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे व पथकाने केला. (प्रतिनिधी)मोहिद्दीनचा तिहारमध्ये पाहुणचारमोहिद्दीन याच्याविरोधात सांगली, कोल्हापूर परिसरातील पोलिस ठाण्यांत कोणताही गुन्हा दाखल नाही. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही. पण दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. त्याची मैत्रीण काही वर्षापूर्वी दिल्लीला गेली होती. त्यावेळी तिच्यामागे तोही दिल्लीत पोहोचला. एका हॉटेलबाहेर त्याची ही मैत्रीण एका मित्रासोबत फिरत होती. हे पाहून त्याने त्या मित्रावर सोडावॉटरच्या बाटलीने हल्ला केला होता. याप्रकरणी त्याला अटक होऊन तो ८५ दिवस तिहार कारागृहात होता. साथीदाराला गंडविलेमोहिद्दीन मुल्ला याने परप्रांतीय साथीदाराच्या मदतीने तीन कोटींचे घबाड मिळविले. पण या रकमेतील वाटणी त्याला दिली नाही. केवळ चार ते पाच हजार रुपये देऊन त्याने साथीदाराला पिटाळून लावले. त्यानंतर त्याने ही रक्कम मिरजेतील बेथेलहेमनगरमधील आपल्या मेहुणीच्या घरात आणून ठेवली. ‘एका मित्राची बॅग असून, तो गावाला गेला आहे. परत आल्यानंतर त्याला बॅग देणार आहे,’ असे त्याने तिच्या घरच्यांना सांगितले होते.