सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:25 IST2021-05-14T04:25:54+5:302021-05-14T04:25:54+5:30
तलाठी-ग्रामसेवकांच्या अनेक जागा रिक्त सांगली : जिल्ह्यात तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. एका तलाठी व ग्रामसेवकांकडे दोन ...

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
तलाठी-ग्रामसेवकांच्या अनेक जागा रिक्त
सांगली : जिल्ह्यात तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. एका तलाठी व ग्रामसेवकांकडे दोन ते तीन गावांचा पदभार असल्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे. रिक्त पदे शासनाने भरुन शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
सांगली : शहरातील संजय नगर येथील शंभर फूट रस्त्यावर घाणीचे साम्राज्य असून, याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
सांगली : जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पशुपालन योजनांची जनजागृती करा
सांगली : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात; मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
सांगली : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर करण्याचे आदेश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. परिणामी, त्यांना शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे.
ग्रामीण भागात गॅस एजन्सीची गरज
सांगली : वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनाचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. शिराळा पश्चिम भागातील कुटुंबीयांना मोफत गॅस दिले आहेत; पण त्या परिसरात गॅस एजन्सी जवळ नसल्यामुळे नागरिकांना वेळेत गॅस मिळण्यात अडचणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.