रांजणवाडीत विजेच्या धक्क्याने म्हैस ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:27 IST2021-04-16T04:27:27+5:302021-04-16T04:27:27+5:30

कोकरुड : रांजणवाडी (ता. शिराळा) येथे रविवारी वादळी वाऱ्याने विद्युत तार तुटून म्हशीला विजेचा धक्का बसला. यात ती जागीच ...

Buffalo killed by lightning in Ranjanwadi | रांजणवाडीत विजेच्या धक्क्याने म्हैस ठार

रांजणवाडीत विजेच्या धक्क्याने म्हैस ठार

कोकरुड : रांजणवाडी (ता. शिराळा) येथे रविवारी वादळी वाऱ्याने विद्युत तार तुटून म्हशीला विजेचा धक्का बसला. यात ती जागीच ठार झाली. यात शेतकऱ्याचे अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

मेणी येथील महादेव पाटील यांची रांजणवाडी येथे घराला लागून जनावरांची लोखंडी शेड आहे. रविवार १३ रोजी वादळी वाऱ्याने विजेची तार तुटून शेडवर पडली होती. दीड दिवस वीज सेवा खंडित असल्याने काही समजले नव्हते. सोमवारी दुपारी वीज सुरू झाली आणि तुटलेल्या तारेतील विद्युत प्रवाह शेडच्या लोखंडी भागात उतरला. यामुळे म्हशीला विद्युत धक्का बसून ती तडफडून जागीच मृत झाली. यामुळे पाटील यांचे अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी अशोक आटूगडे, तलाठी अमित जंगम यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

Web Title: Buffalo killed by lightning in Ranjanwadi