बुधगावची पाणी योजना लाल फितीत अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:05+5:302020-12-13T04:40:05+5:30

बुधगाव गावासाठी ४ कोटी ७६ लाख ९७ हजार ११५ रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. ...

Budhgaon's water scheme stuck in red tape | बुधगावची पाणी योजना लाल फितीत अडकली

बुधगावची पाणी योजना लाल फितीत अडकली

बुधगाव गावासाठी ४ कोटी ७६ लाख ९७ हजार ११५ रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मुदतीनंतर आठ महिने उशिराने ही योजना पूर्ण झाली. हे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे. या विभागाने वीज पुरवठा कनेक्शन जोडणीसाठी ठेकेदार नेमण्याची निविदा प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे. या कारभाराबाबत नाराजी वाढत आहे. यामुळे ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करुन योजना तातडीने कार्यान्वित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विक्रम पाटील यांनी दिला आहे.

चौकट

अध्यक्षा व उपाध्यक्षांचे आश्वासन

बुधगाव पाणीपुरवठा योजनेबाबत जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग वेळकाढूपणाचे धोरण राबवत आहे, अशी तक्रार विक्रम पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे व उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्याकडे केली. याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पाटील यांना दिले.

Web Title: Budhgaon's water scheme stuck in red tape