सर्पमित्र संजय माळींच्या कुटुंबियांना बुधगावकरांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:25 IST2021-03-26T04:25:38+5:302021-03-26T04:25:38+5:30

बुधगाव : सर्पदंशाने मृृत्युमुखी पडलेले तासगाव येथील सर्पमित्र संजय माळी यांच्या कुटुंबियांना बुधगाव (ता. मिरज) येथील नागराज मित्र परिवारातर्फे ...

Budhgaonkar's helping hand to the family of snake friend Sanjay Mali | सर्पमित्र संजय माळींच्या कुटुंबियांना बुधगावकरांचा मदतीचा हात

सर्पमित्र संजय माळींच्या कुटुंबियांना बुधगावकरांचा मदतीचा हात

बुधगाव : सर्पदंशाने मृृत्युमुखी पडलेले तासगाव येथील सर्पमित्र संजय माळी यांच्या कुटुंबियांना बुधगाव (ता. मिरज) येथील नागराज मित्र परिवारातर्फे पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

संजय माळी हे दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी चिंचणी येथे घोणस जातीचे दोन साप पकडत होते. यावेळी सर्पदंशाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेतमजुरी करणाऱ्या संजय माळी यांच्या पश्चात असलेला पत्नी, दोन लहान मुली व मुलगा असा परिवार पोरका झाला. साप पकडण्यासाठी अहोरात्र विनामोबदला फिरणाऱ्या माळी यांना तासगावकरांनीही तातडीने आर्थिक मदत दिली होती.

बुधगाव येथील सर्पमित्र गजानन जाधव यांनी नागराज मित्र परिवारातर्फे समाजमाध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. माळी यांच्या दोन मुलींच्या नावे प्रत्येकी पंचवीस हजार, अशी पन्नास हजार रुपयांच्या मुदत ठेवीची मदत करण्यात आली. नागराज मित्र परिवाराचे गजानन जाधव, अनिल पाटील, वैभव बंडगर, विक्रम पाटील यांनी माळी यांची पत्नी सुवर्णा, मुली द्रौपदी, काजल व मुलगा अक्षय यांच्याकडे ठेवपावत्या सुपूर्द केल्या. यावेळी संभाजी पाटील, उत्तम पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी भीमराव घेरडे उपस्थित होते.

Web Title: Budhgaonkar's helping hand to the family of snake friend Sanjay Mali