बुधगावात उद्यापासून कडकडीत बंद पाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST2021-04-23T04:28:41+5:302021-04-23T04:28:41+5:30

बुधवारी तहसीलदार डी. एस. कुंभार, गटविकास अभिकारी आप्पासाहेब सरगर यांनी ग्रामपंचायतीत बैठक घेऊन वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर साखळी तोडण्यासाठी ...

Budhgaon will be strictly closed from tomorrow | बुधगावात उद्यापासून कडकडीत बंद पाळणार

बुधगावात उद्यापासून कडकडीत बंद पाळणार

बुधवारी तहसीलदार डी. एस. कुंभार, गटविकास अभिकारी आप्पासाहेब सरगर यांनी ग्रामपंचायतीत बैठक घेऊन वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर साखळी तोडण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन समितीने बंदचा निर्णय घेतला. या बंदवेळी फक्त रुग्णालये, औषध दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे ठरले. दूध विक्रेत्यांना सकाळी सात ते नऊ या वेळेत दुकानाबाहेर थांबून विक्री करण्यास परवानगी असेल. दूध संकलन करणाऱ्या डेअरी सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ७ ते ९ उघड्या राहतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय झाला.

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या नियमबाह्य कारवाईसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुखांना समिती निवेदन देणार आहे. सरपंच सुरेश ओंकारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्पक्ष रामदास पाटील, शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील, राजेंद्र शिवकाळे, ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे यांच्यासह गावातील व्यापारी उपस्थित होते.

Web Title: Budhgaon will be strictly closed from tomorrow