बसपा कवठेमहांकाळ पालिका निवडणुक लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:25 IST2021-02-13T04:25:07+5:302021-02-13T04:25:07+5:30

शिरढोण : कवठेमहांकाळ नगर पंचायतीच्या आगामी निवडणकीत बहुजन समाज पार्टी उतरणार असल्याची माहिती या पक्षाचे प्रदेश सचिव शंकर माने ...

BSP will contest Kavthemahankal Palika elections | बसपा कवठेमहांकाळ पालिका निवडणुक लढणार

बसपा कवठेमहांकाळ पालिका निवडणुक लढणार

शिरढोण : कवठेमहांकाळ नगर पंचायतीच्या आगामी निवडणकीत बहुजन समाज पार्टी उतरणार असल्याची माहिती या पक्षाचे प्रदेश सचिव शंकर माने यांनी दिली.

कवठेमहांकाळ येथील विजय नगरमध्ये शाखा उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील दोन ग्रामपंचायतींमधील उमेदवारांबरोबरच नवनिर्वाचित प्रदेश सचिव शंकर माने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

शंकर माने म्हणाले की, आगामी काळात शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने काम करून बहुजन समाजाला न्याय मिळवून देणार आहे. यावेळी मन्सूर आत्तार, सुमीत गाडे, भूषण चंदनशिवे, अजित चंदनशिवे, लक्ष्मण दुधाळ, प्रीतम चंदनशिवे, जुबेर मोमीन, गणेश मोरे, आनंदा वाघे, अजित खोत, विनायक हंकारे, संदीप सूर्यवंशी, उमेश भोसले, बंधू साळुंखे, प्रवीण हंकारे, शहाजी केंगार, विजय वाघमारे, सुनील खोत, सिद्धनाथ माने, सचिन गभाले उपस्थित होते.

Web Title: BSP will contest Kavthemahankal Palika elections