सासरच्या लोकांची मारहाण; जावयाची आत्महत्या

By Admin | Updated: May 30, 2014 01:03 IST2014-05-30T01:01:22+5:302014-05-30T01:03:25+5:30

शिराळा तालुक्यातील प्रकार : पत्नीसह चौघांना अटक

Brutality Javanese suicide | सासरच्या लोकांची मारहाण; जावयाची आत्महत्या

सासरच्या लोकांची मारहाण; जावयाची आत्महत्या

शिराळा : सासरच्या लोकांनी मारहाण केल्याच्या कारणावरून वाडीभागाई (ता. शिराळा) येथील मारुती बाबूराव पाटील (वय ३५) यांनी झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी आठच्या दरम्यान घडला. याबाबत आई इंदुबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिराळा पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी मारुती यांची पत्नी दीपाली, मेहुणा शंकर शेळके, सासू शांता शेळके, मामेसासरा बाळाराम दत्तू लुगडे यांना अटक केली आहे. मारुती पाटील यांचा पुनवत (ता. शिराळा) येथील दीपाली शेळके यांच्याशी नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोन वर्षांपासून दोघांमध्ये घरगुती कारणावरून सतत भांडणे होत. भांडण झाल्यानंतर दीपाली नेहमी माहेरी जात असे. काल बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान मारुती यांचे दीपालीसोबत भांडण झाले. त्यानंतर दीपालीने भाऊ शंकर, आई व मामा यांना घरी बोलावून घेतले. त्यांनी दीपालीला माहेरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता, मारुती यांनी त्यांना अडविले. यावेळी त्यांना दीपालीचा भाऊ शंकरने मारहाण केली. त्यांच्या आईला शांता शेळके हिने मारहाण केली. मामा बाळाराम लुगडे व दीपालीने त्यांना मारहाणीसाठी प्रवृत्त केले. मारहाणीनंतर दीपालीला सानिका (वय ७), सूरज (५) या मुलांसह माहेरी नेण्यात आले. सासरच्या लोकांनी मारहाण केल्याने अपमानित झालेले मारुती पाटील घरातून निघून गेले. त्यांनी आज सकाळी आठच्या दरम्यान गावातील शंकर लुगडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मारुती यांच्या पत्नीसह चौघांना अटक केली. सहायक पोलीस फौजदार बळीराम घुले तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Brutality Javanese suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.