शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

Sangli News: बेडग येथे सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू, रमजान महिन्यातच सनदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 18:20 IST

तलावात दोघा भावांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी

सदानंद औंधेमिरज : बेडग ता. मिरज येथे नागरगोजेवाडीत पोहायला तलावात गेलेल्या दोन बालकांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. अयाज युनुस सनदी (वय ९) व अफान युनुस सनदी (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बेडग गावातील टेम्पोचालक युनूस नसरुद्दीन सनदी आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांना दोन मुले आहेत. तिसरीत शिकणारा अयाज व पहिलीत शिकणारा अफान हे दोघे दुपारी शाळेतून परिक्षा देऊन आल्यानंतर मासे पकडण्यासाठी  सार्वजनिक पाझर तलावात गेले होते. यावेळी दोघेही पोहण्यासाठी तलावात उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. मुलांचा आरडाओरडा ऐकून तेथे आलेल्या शाहिद मुजावर याने दोघांना तलावातून बाहेर काढले. मात्र, अयाज व अफान यांचा बुडाल्याने मृत्यू झाला. तलावात दोघा भावांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रमजान महिन्यात नागरगोजेवाडी येथील सनदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने पालकांचा आक्रोश सुरु होता. या घटनेने नागरगोजेवाडी येथे शोककळा पसरली होती.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू