ब्रिटिशकालीन कालव्याची पुन्हा दुरवस्था...
By Admin | Updated: November 11, 2015 00:13 IST2015-11-10T22:20:12+5:302015-11-11T00:13:53+5:30
या कालव्यामध्ये साचलेला गाळ काढण्याची, नव्याने अस्तरीकरणाची व नव्याने दुरुस्ती करण्याची गरज असून, त्यासाठी पाठपुरावा आवश्यक

ब्रिटिशकालीन कालव्याची पुन्हा दुरवस्था...
किर्लोस्करवाडी : विजेसाठी एक रुपयाही खर्च न करता केवळ सायपन पद्धतीने वाहणाऱ्या ब्रिटिशकालीन कृष्णा कालव्याची दुरवस्था झाली आहे. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नेतेमंडळी आणि प्रशासनाने पाठपुरावा करण्याची गरज आहे.
कऱ्हाड, वाळवा, पलूस आणि तासगाव तालुक्यातील सुमारे ४१ हजार ३०२ एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारा हा कालवा बारमाही वाहता रहावा, यासाठी कृती समिती स्थापन करुन शासनावर दबाव आणला होता. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या कालव्याला २७० टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र आजअखेर हे पाणी कोणत्या धरणातून मिळणार, याचा निर्णय घेण्यात तत्कालीन व विद्यमान शासनाने पदाधिकारी व अधिकारी घेऊ शकले नाहीत. आजही हा निर्णय झालेलाच नाही. कृती समितीने मागणी केल्यानंतरच २००६-२००७ साठी जागतिक बँकेच्या अर्थसहायातून सुमारे १६ कोटी खर्च करुन कालव्याच्या दोन्ही बाजूचे रस्ते करण्यात आले होते. कालव्याच्या सुरुवातीपासून खोडशीपासून ते वसगडेपर्यंतच्या ८६ किमीच्या कालव्यात आणि आजूबाजूच्या पोटकालव्यांमध्ये झाडे-झुडपे तसेच गवत उगवले असून, या कालव्यामध्ये साचलेला गाळ काढण्याची, नव्याने अस्तरीकरणाची व नव्याने दुरुस्ती करण्याची गरज असून, त्यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे. (वार्ताहर)