शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

सांगली जिल्ह्यातील पुलांचे ऑडिट झाले, पण फक्त मलमपट्टीच; नूतनीकरणाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 17:01 IST

महाडच्या दुर्घटनेनंतर सर्वच मोठ्या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश देण्यात आले.

सांगली : सहा वर्षांपूर्वी महापुरात महाडजवळ सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन बसेस वाहून गेल्या होत्या. त्यानंतर राज्यभरातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश शासनाने दिले. सांगली जिल्ह्यात ऑडिट झाले, पण नंतर पुलांची फक्त मलमपट्टीच झाली, भरभक्कम कार्यवाही मात्र झालीच नाही.

जिल्ह्यातील बहुतांश महत्त्वाचे पूल २५ वर्षांहून अधिक जुने आहेत. सांगलीतील ‘आयर्विन’ नव्वदीत असून मिरज नाल्यावरील पूलही जुना आहे. मिरज ते कृष्णाघाट यादरम्यानचा नदीवरील पूल ३० वर्षांपूर्वीचा आहे. मिरजेत कोल्हापूर रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूलही जुना आहे. जिल्ह्यातील अनेक पुलांनी आतापर्यंत तीन ते चारवेळा महापुराचे तडाखे सोसले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वेळोवेळी वरवर पाहणी झाली.महाडच्या दुर्घटनेनंतर मात्र मुंबईतूनच फर्मान निघाले. सर्वच मोठ्या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश देण्यात आले. मिरजेत म्हैसाळ रस्त्यावर नाल्यावरील पुलाची स्थिती धोकादायक असल्याची नोंद यामध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर सर्वच पुलांची नाममात्र डागडुजी झाली. नव्याने उभारणी किंवा पूर्ण दुरुस्ती झालीच नाही. अर्जुनवाड पुलावर ‘सस्पेंशन’ बसविण्यात आले, तर आयर्विन पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली.

याची आवश्यकता- हेरवाड ते दिघंची राज्यमार्गावरील कृष्णाघाट-अर्जुनवाड पुलाचे रुंदीकरण- मिरज नाल्यावरील पुलाला पर्यायी पूल- मिरज ते कोल्हापूर रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाला पर्यायी पूल

रेल्वेची सुपरफास्ट कामगिरी

सततच्या महापुरानंतर रेल्वेने मात्र पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची सुपरफास्ट कामगिरी केली. लोहमार्गावरील सर्वच पूल आपल्या बांधकाम विभागामार्फत तपासून घेतले. प्रत्येक पुलावर फलकही लावून त्यावर बांधकामाचा तपशील, ऑडिटची तारीख व तो सुरक्षित असल्याचा शेरा लिहिला. तसे चित्र जिल्ह्यातील रस्त्यांवरील पुलांबाबत मात्र दिसले नाही.

शासनाच्या आदेशानंतर सर्वच महत्त्वाच्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. एकही पूल धोकादायक यादीत नाही. आयर्विन पूलही धोकादायक स्थितीत नाही. त्यावरील पदपथाचे काँक्रिटीकरण आवश्यक असून तसा प्रस्ताव पाठविला आहे. महापुरानंतर प्रत्येक पुलाची वेळोवेळी पाहणी केली जाते. - संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :Sangliसांगली