शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत लाचखोर सरकारी वकिलास पाठलाग करून पकडले, खटला निकाली काढण्यासाठी घेतली लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 11:47 IST

सहायक सरकारी वकिलास लाचप्रकरणी अटक करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ

सांगली : न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात तडजोड घडवून तो लवकर निकाली काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर दुचाकीवरून निघालेला सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. सोमनाथ काकासो माळी (वय ३६, रा. गणेश कॉलनी, सुभाषनगर, मिरज) याला पाठलाग करून रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.अधिक माहिती अशी, ॲड. माळी हा सांगलीत प्रथमवर्ग न्यायालयात सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांच्याविरोधातील खटला न्यायालयात दाखल आहे. या खटल्यात तडजोड घडवून तो लवकर निकाली काढण्यासाठी ॲड. माळी याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रारदार याने शुक्रवार, दि. ८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार, दि. ११ रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये ॲड. माळी याने तक्रारदाराकडे खटला निकाली काढण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २० हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विजयनगर येथे जिल्हा न्यायालयाबाहेर सापळा लावला होता. त्यावेळी ॲड. माळी याने विजयनगर रस्त्यावर दुचाकीवरच तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून २० हजारांची लाच स्वीकारली. रक्कम स्वीकारल्यानंतर तो दुचाकीवरून थेट दुसऱ्या कामासाठी निघाला. त्यामुळे पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. दुचाकीवरून नेमिनाथनगर येथे श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील हायस्कूल येथे आल्यानंतर त्याला पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला मंगळवारी विशेष न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे आणि दत्तात्रय पुजारी, पोलिस अंमलदार प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, अजित पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, ऋषिकेश बडणीकर, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, सीमा माने आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

पहिलीच कारवाईसहायक सरकारी वकिलास लाचप्रकरणी अटक करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यामुळे या कारवाईची वकील वर्गासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीadvocateवकिलBribe Caseलाच प्रकरण