शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अंगणवाडी सेविकेच्या पदोन्नतीसाठी लाचखोरी, तासगावात पंचायत समितीत भ्रष्टाचार चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 18:19 IST

दत्ता पाटील तासगाव : तासगाव तालुक्यात ११ ठिकाणी अंगणवाडीतील पात्र मदतनिसांना सेविकापदी नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, ही पदोन्नती ...

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव तालुक्यात ११ ठिकाणी अंगणवाडीतील पात्र मदतनिसांना सेविकापदी नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, ही पदोन्नती देताना तासगाव पंचायत समितीतील बाल विकास प्रकल्पातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून प्रत्येकी दहा हजार रुपये लाच घेतल्याची चर्चा आहे. जिल्हास्तरावर ही रक्कम द्यावी लागणार असल्याचे सांगून ही लाच घेण्यात आली. तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या मदतनिसांकडून लाच घेतल्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.शासनाने दोन वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीला स्थगिती दिली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, त्यामध्ये अतिरिक्त गुणांकन सवलतीत मराठा समाज लाभापासून वंचित राहत असल्याने ही भरती स्थगित करण्याचा निर्णय झाला. नवीन अंगणवाडी मदतनीस भरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याच वेळी अंगणवाडीतील पात्र मदतनीस यांना सेविका पदावर थेट नियुक्तीचा निर्णय २७ फेब्रुवारी २०२४ ला शासनाने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश १० सप्टेंबर रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले होते.शासन निर्णयानुसार तासगाव तालुक्यातील बाल विकास प्रकल्पांतर्गत रिक्त असणाऱ्या अंगणवाडी सेविका या पदासाठी पात्र असलेल्या मदतनिसांची बैठक घेण्यात आली. पात्र असणाऱ्या मदतनिसांकडून कागदपत्रांची पूर्तता आणि पडताळणी केली. त्यानंतर तालुक्यातील ११ अंगणवाड्यांमध्ये पात्र मदतनीस यांची सेविका म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली. २८ सप्टेंबर रोजी नियुक्ती आदेश देण्यात आले.

अशी झाली लाचखोरी..नियुक्तीची सर्व प्रक्रिया शासन आदेशानुसार झाली. मात्र तरीही तासगाव पंचायत समितीतील बाल विकास प्रकल्पातील काही अधिकाऱ्यांनी पदोन्नती करताना प्रत्येकी दहा हजार रुपयांची लाच घेतली. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही रक्कम द्यावी लागणार आहे, असा निरोप काही पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आला. त्यामुळे अपवाद वगळता नियुक्ती झालेल्या सर्व अंगणवाडी सेविकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये लाच वरिष्ठांना दिल्याची चर्चा पंचायत समितीत आणि अंगणवाडी सेविकांत सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

अंगणवाडी सेविकापदाची पात्रता..अंगणवाडी मदतनीस म्हणून किमान दोन वर्षे अनुभव. तसेच, ऑगस्ट २०२२ पूर्वी अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती असल्यास दहावी उत्तीर्णची अट; तर ऑगस्ट २०२२ नंतर अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती असल्यास बारावी उत्तीर्णची अट.

अंगणवाडी मदतनीस या पदावरून सेविका या पदावर शासन निर्णयानुसार रीतसर नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोणतीही लाचखोरी झालेली नाही. सर्व नियुक्त्या पारदर्शी पद्धतीने केलेल्या आहेत. -मनीषा साळुंखे, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती, तासगाव.

टॅग्स :Sangliसांगलीpanchayat samitiपंचायत समितीCorruptionभ्रष्टाचार