मालगावातील द्राक्ष बागायतदारास चार लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST2021-08-22T04:29:47+5:302021-08-22T04:29:47+5:30
मालगावात फैय्याज मुतवल्ली यांची दोन एकर द्राक्षबाग आहे. मार्च २०१९ मध्ये गुजरात येथील फळव्यापारी असिफ तांबोळी ...

मालगावातील द्राक्ष बागायतदारास चार लाखांचा गंडा
मालगावात फैय्याज मुतवल्ली यांची दोन एकर द्राक्षबाग आहे. मार्च २०१९ मध्ये गुजरात येथील फळव्यापारी असिफ तांबोळी बागवान व त्यांच्या मुलांनी मुतवल्ली यांच्या बागेतील द्राक्ष खरेदीचा व्यवहार केला. त्यासाठी त्यांनी फैयाज मुतवल्ली यांना आठ लाख रुपये रोख देण्याचे ठरले. मार्च महिन्यात त्यांनी संपूर्ण बागेतील द्राक्षे तोडली. मात्र, द्राक्षे गाडीत भरल्यानंतर त्यांनी आगाऊ रक्कम म्हणून केवळ तीन लाख ७० हजार रुपये दिले. उर्वरित चार लाख ३० हजार रुपये माल पोहोचल्यानंतर पाठवून देतो असे सांगून निघून गेले. त्यानंतर गेले वर्षभर मुतवल्ली या व्यापाऱ्यांकडे वारंवार पैशाची मागणी करत होते. मात्र, संबंधित फळव्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांनी ग्रामीण पोलिसात तिघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे. फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक गुजरातला जाणार आहेत.