शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

परिपत्रकासाठी एकरकमी योजनेला ‘ब्रेक’

By admin | Updated: July 16, 2015 23:28 IST

भू-विकास बँक : योजनांबाबतही संभ्रमावस्था कायम

अविनाश कोळी -सांगली -राज्यातील भू-विकास बॅँका बंद करण्याच्या निर्णयाबरोबरच कर्जवसुलीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या एकरकमी परतफेड योजनेला परिपत्रकाअभावी ‘ब्रेक’ लागला आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन दोन महिने उलटले तरी, यासंदर्भातील परिपत्रक न निघाल्यामुळे जिल्हा बॅँकांची संभ्रमावस्था वाढली आहे. भू-विकास बँकांच्या प्रश्नावर नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीने मे महिन्यात बँका बंद करण्याचा निर्णय घेतला. अवसायनाची प्रक्रिया राबविताना कर्जवसुलीसाठी एकरकमी परतफेड योजना, कर्मचाऱ्यांची देणी, समायोजन, तसेच राज्य शासनाची एकूण वसुली कोणत्या माध्यमातून करायची, या गोष्टी निश्चित करण्यात आल्या. शासनाला भू-विकास बँकांकडून १९०० कोटी रुपये येणे आहेत, हा मुद्दा वारंवार चर्चेत आला. त्याच आधारावर शासनाने या बँका बंद करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असला तरी, यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक अद्याप निघालेले नाही. त्याच शासनाने येणी-देणी निश्चित केली नसल्याने गोंधळ वाढला आहे. राज्य भू-विकास कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करूनही शासनाकडून परिपत्रकाविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळत नाही. राज्य भू-विकास कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार शासनाकडे येणी-देणी निश्चितीवर शिक्कामोर्तब करण्याची विनंती केली होती. मात्र आजअखेर शासनाकडून याबाबतची आकडेवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे केवळ शासनाच्याच थकबाकीची रक्कम चर्चेत राहिली. येणी-देणी निश्चित झाल्यानंतर राज्यभरातील बँकांच्या आर्थिक स्थितीचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील ११ बँकांच्या सक्षमतेवरही शिक्कामोर्तब होणार आहे. सक्षम आणि असक्षम बँका शासनाच्या आदेशाने अवसायनातच निघणार आहेत. ज्या बँका सक्षम आहेत, त्यांनाही राज्यभरातील हिशेबाच्या आकडेवारीची प्रतीक्षा लागली आहे. ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा शासनाविरोधात लढा उभारण्याची तयारी सक्षम बँकांच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे. ‘त्या’ संस्थांना भुर्दंडराज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ५ एप्रिल २०१३ रोजी कवठेएकंद येथील दोन पाणीपुरवठा संस्थांना सवलत दिली. २०१२ मध्ये या संस्थांचा हिशेब केला. त्यावेळी ९ कोटी ३९ लाख २० हजार थकबाकी होती. या निर्णयामुळे संबंधित संस्थांना नाहक तीन वर्षाच्या व्याजाचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. शासनाने जिल्ह्यातील अन्य पाणीपुरवठा संस्था सोडून कवठेएकंदच्या दोन्ही संस्थांनाच सवलत दिल्याने कर्मचारी संघटनेने याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ही बाब आता न्यायप्रविष्ट आहे. कर्जवसुलीस थंडा प्रतिसादबॅँका बंद करण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केल्यामुळे थकबाकीदार कर्जदारांनी कर्ज परतफेडीबाबत निरुत्साह दाखविला. कर्जवसुलीवर कर्मचाऱ्यांच्या मोबदल्याची रक्कम अवलंबून असल्याने सध्याच्या वसुलीच्या स्थितीमुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.