शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बेडगप्रकरणी सुनावणीवर आंबेडकर गटाचा बहिष्कार, चौकशी समितीने १८३ ग्रामस्थांची बाजू घेतली जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 14:12 IST

ग्रामस्थांकडून बंद मागे, व्यवहार सुरळीत

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान पाडल्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता. यावर जिल्हा परिषदेतील सहा अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने शुक्रवारी सुनावणी घेतली. या सुनावणीस आजी-माजी सरपंच, उपसरपंचासह गावातील १८३ ग्रामस्थांनी हजेरी लावून त्यांची बाजू चौकशी समितीसमोर मांडली. त्यामुळे बेडगच्या ग्रामस्थांनी बंद मागे घेऊन व्यवहार सुरळीत चालू ठेवले. पण, या चौकशीवर आंबेडकरी गटाच्या ग्रामस्थांनी बहिष्कार घालत जिल्हा परिषदेत कोणीच बाजू मांडण्यासाठी आले नव्हते.बेडग येथील डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडली आहे. यावरून गावामध्ये दोन गटात वाद चालू आहे. स्वागत कमान पाडल्याप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, म्हणून आंदोलकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाची दखल घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांची समिती गठित केली होती. यामध्ये प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, समाजकल्याण अधिकारी बाबासाहेब कामत, कार्यकारी अभियंता भारती बिराजे सहभागी होते.या चौकशी समितीसमोर १८३ ग्रामस्थांनी त्यांची बाजू मांडली. काहींनी लेखी स्वरुपात आपली बाजू प्रशासनाकडे दिली आहे. प्रशासनाने समाधानकारक बाजू जाणून घेतल्यामुळे ग्रामस्थांनी बेडग बंद मागे घेऊन कामकाज सुरळीत चालू ठेवले होते. दरम्यान, या चौकशीवर आंबेडकरी गटाने बहिष्कार घातल्यामुळे कोणीच चौकशीसाठी आले नव्हते.

मंगळवारी चौकशी समिती बेडगला जाणार

जिल्हा परिषदेत चौकशी समितीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्थक गटाचे ग्रामस्थ आले नाहीत. म्हणून चौकशी समितीने मंगळवार, १ ऑगस्ट रोजी बेडग येथे भेट देऊन त्यांची बाजू जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिस बंदोबस्त, पण शांततेत सुनावणीबेडगचे दोनशेंवर ग्रामस्थ जिल्हा परिषदेत चाैकशी समितीसमोर हजर झाले होते. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पण, ग्रामस्थांनी शांततेत सुनावणीला हजर राहून आपली बाजू मांडली. प्रशासनाने बाजू जाणून घेतल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

पंधरा दिवसात कारवाई मागे घेण्यासाठी मुदतडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांवर कारवाईची नोटीस बजावली आहे. तसेच गुन्हे दाखल केलेले आहेत. ते मागे घेण्यासाठी बेडगच्या लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी पंधरा दिवसाची मुदत चौकशी समितीला दिली आहे. तोपर्यंत बंद मागे घेऊन गावातील व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत.

टॅग्स :Sangliसांगली