बिऊर येथील दोन्हीही चोऱ्यांचा छडा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:56+5:302021-05-31T04:20:56+5:30
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथे दोन महिन्यांत भरदिवसा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले ...

बिऊर येथील दोन्हीही चोऱ्यांचा छडा नाही
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथे दोन महिन्यांत भरदिवसा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन्ही घटनांत माहीतगार व्यक्तीकडून चोरी झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मात्र, या चोरीचा छडा लागलेला नाही, त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे.
येथील शेतकरी प्रकाश शिवाजी पाटील यांच्या घरातून अज्ञात चोरट्यानी मंगळवार, दि. ६ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भर दुपारी ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५ हजार रुपये असा ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता, तर शनिवार, दि. २९ मे रोजी सकाळी ९.३० ते १२.३० दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून तिजोरीतील तीन तोळ्याचे ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटनांत घराच्या किल्ल्या अथवा तिजोरीच्या किल्ल्या, पैसे, दागिने कोठे ठेवले आहेत याची पूर्ण माहिती असणाऱ्या चोरट्याने या दोन्ही चोऱ्या केल्या आहेत.