शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडीसाठी हालचाली; पुण्यात फिस्कटले सांगलीत जुळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:02 IST

तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक

सांगली : भाजपच्या महायुतीतून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने नव्या आघाडीसाठी चर्चेची दारे खुली केली आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांची शनिवारी रात्री उशिरा बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती म्हणून सामोरे जाण्याची घोषणा केली होती. पण राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत भाजपची चर्चा जागा वाटपाच्या टप्प्यावर थांबली. त्यात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात मिरजेतील माजी महापौरसह अनेक नगरसेवकांनी प्रवेश केल्याने मिरजेतील भाजपची गणितेच बिघडली. त्यात राष्ट्रवादीने ३० जागांची मागणी करीत भाजपवर दबाव वाढविला होता. अखेर भाजप व राष्ट्रवादीने (अजित पवार) स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येण्याचा निर्धार केला. महाआघाडी म्हणून इच्छुकांच्या मुलाखतीही पार पडल्या.

राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर सांगलीतील समीकरणेही बदलली आहेत. महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटासोबत आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षही सोबत येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील हे आज सांगलीत दाखल झाले. त्यानंतर या हालचालींना वेग आला. दुपारी मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुक तयारीचा आढावा घेतला. महायुती नको, स्वतंत्रच लढू या, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, संजय बजाज यांची मंत्री पाटील यांच्यासोबत आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत नवीन ट्विस्ट झाला असून नव्या आघाडीमुळे भाजपसमोर आव्हान उभे राहणार आहे.चौकट

विश्वजित कदम गैरहजर

दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बैठकीला पक्षातील प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते. ही आघाडीच्या चर्चेला काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम मात्र गैरहजर होते. ते सांगलीत नसल्याने बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या बैठकीत राष्ट्रवादी (अजित पवार) व महाआघाडीत जागा वाटपावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सेना-मनसे एकत्र येणार

शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसेची राज्यात युती झाली आहे. सांगलीतही हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. महाआघाडीसोबत शिवसेनेची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या मिळणाऱ्या जागेतून मनसेला जागा सोडल्या जाणार आहेत. जागा वाटपाची ही चर्चा फिस्कटल्यास सेना व मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातील, असे मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP & Congress Alliance Moves: Pune Fails, Will Sangli Succeed?

Web Summary : NCP (Ajit Pawar) explores alliance with Congress in Sangli after breakdown with BJP. Discussions underway, potentially reshaping local election dynamics. Sena-MNS may unite.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार