शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसने मंगळवारच्या भारत बंदला पाठिंबा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:28 IST2020-12-06T04:28:18+5:302020-12-06T04:28:18+5:30

ते म्हणाले, समविचारी शेतकरी संघटना, कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून महाराष्ट्रात भारत बंदच्यादिवशी महाराष्ट्र ...

Both the Congress and Shiv Sena should support Tuesday's Bharat Bandh | शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसने मंगळवारच्या भारत बंदला पाठिंबा द्यावा

शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसने मंगळवारच्या भारत बंदला पाठिंबा द्यावा

ते म्हणाले, समविचारी शेतकरी संघटना, कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून महाराष्ट्रात भारत बंदच्यादिवशी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी किसान सभेने प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्रातील भाजप सोडून उर्वरित सर्वच राजकीय पक्षांनी भारत बंदच्यादिवशी महाराष्ट्र बंद व्हावा, यासाठी शेतकऱ्यांना समर्थन द्यावे व बंद यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे आंदोलनात उतरावे, असे आवाहन किसान सभा करत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांच्या या बंदला समर्थन द्यावे. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना रोखण्यासाठी सुरू असलेल्या दिल्ली येथील अन्नदाता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने भारत बंदच्यादिवशी महाराष्ट्र बंद ठेवून शेतकरी आंदोलनाचे समर्थन करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले.

Web Title: Both the Congress and Shiv Sena should support Tuesday's Bharat Bandh