दोघे उच्चशिक्षित, तर चौघे पदवीधर
By Admin | Updated: October 21, 2014 22:44 IST2014-10-21T22:44:43+5:302014-10-21T22:44:43+5:30
पतंगराव सर्वात ज्येष्ठ आमदार : सहाजण शेतकरी

दोघे उच्चशिक्षित, तर चौघे पदवीधर
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आठ आमदारांपैकी दोघे उच्चशिक्षित, तर चौघेजण पदवीधर आहेत. त्याचबरोबर सहाजणांचा व्यवसाय शेती असून, इतर दोघे मात्र व्यावसायिक आहेत. पतंगराव कदम सर्वात ज्येष्ठ आमदार ठरले असून, जयंत पाटील हे सर्वात कमी वयाचे आमदार ठरले आहेत.
नवनिर्वाचित आमदारांचे शिक्षण, वय आणि व्यवसायाचा आढावा घेतला असता, यामध्ये दोन आमदार व्यावसायिक असल्याचे, तर उर्वरित सर्व शेतकरी असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील बावीस लाख मतदारांनी १०७ उमेदवारांतून आठजणांची निवड केली आहे.
यामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ व जतमधून विलासराव जगताप हे पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करीत आहेत. इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील व तासगाव मतदारसंघातून आर. आर. पाटील हे सलग सहाव्यांदा विधानसभेत प्रवेश करीत आहेत. तसेच पतंगराव कदम पलूस-कडेगाव मतदारसंघातून सहाव्यांंदा विधानसभेत प्रवेश करीत आहेत.
शिराळा मतदारसंघातून चौथ्यांदा शिवाजीराव नाईक निवडून आले आहेत. खानापूर-आटपाडी मतदारसंघातून अनिल बाबर तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. मात्र दोघांचा प्रवास अखंडित आहे. सुरेश खाडे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले असले तरी, त्यांचा पहिल्यांदा मतदारसंघ जत होता व नंतरची दोन वेळची आमदारकी ही मिरजेतून आहे.
जिल्ह्यातील आठपैकी केवळ दोनच आमदार पहिल्यांदा विधानसभेत जात आहेत. इतर सहाजणही तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. खानापूर-आटपाडी मतदारसंघातून अनिल बाबर यांना पंधरा वर्षांच्या काळानंतर आमदारकी मिळाली आहे. (प्रतिनिधी)
आमदारवयशिक्षण व्यवसायसुधीर गाडगीळ६१बी. कॉम. व्यापार
सुरेश खाडे५६एस.एस.सी शेती
विलासराव जगताप६६अभियंता (पदविका) लॉजिंग
आर. आर. पाटील५६बी.ए. एल.एल.बी.शेती
जयंत पाटील५२बी.ई. सिव्हिलशेती
शिवाजीराव नाईक६९बी.एस्सी. (केमिस्ट्री)शेती
डॉ. पतंगराव कदम७०एम.ए. एल.एल.बी.शेती
अनिल बाबर६४बी.ए. शेती