शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Sangli: गुड्डापुरात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 18:02 IST

माडग्याळ : जत तालुक्यातील गुड्डापूर येथे बँक व खासगी सावकारीला कंटाळून शेतकऱ्याने राहत्या घराशेजारील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ...

माडग्याळ : जत तालुक्यातील गुड्डापूर येथे बँक व खासगी सावकारीला कंटाळून शेतकऱ्याने राहत्या घराशेजारील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. सुखदेव मनगेनी बिराजदार (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारी सकाळी बिराजदार यांच्या सुनेला सासरे सुखदेव हे घराशेजारील झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसले.पोलिसांकडून आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव बिराजदार यांनी सोसायटी, बँक व सावकारी कर्जातून दुग्ध व्यवसायाच्या उद्देशाने जर्सी गायी खरेदी केल्या होत्या. पण काही गायींचा आजारामुळे मृत्यू झाला. त्यामुळे केलेल्या गुंतवणुकीचे मोठे नुकसान झाले होते. सध्या ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सुखदेव हे कर्जात बुडाले होते. तशातच काहींनी वसुलीसाठी तगादा लावला होता. कर्जाच्या वसुलीला वैतागून सुखदेव यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांकडून पुढे आली आहे.मृत सुखदेव बिराजदार यांच्या पश्चात वृद्ध आई, मुलगा, मुलगी व सून असा परिवार आहे. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे. जत पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी