बोरगावच्या वीज कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांकडून झापाझापी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:28 IST2021-05-26T04:28:28+5:302021-05-26T04:28:28+5:30

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील वीज कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी बंद असल्याचे स्पष्ट होताच उपकार्यकारी अभियंता राजेंद्र सूर्यवंशी यांनी सर्वांना ...

Borgaon power workers slapped by officials | बोरगावच्या वीज कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांकडून झापाझापी

बोरगावच्या वीज कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांकडून झापाझापी

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील वीज कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी बंद असल्याचे स्पष्ट होताच उपकार्यकारी अभियंता राजेंद्र सूर्यवंशी यांनी सर्वांना खडसावले आहे.

वीज वितरण कंपनीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंपनीने दिलेले मोबाईल नेहमी बंद असतात. त्यामुळे गावातील व परिसरातील ग्राहकांना संपर्क साधता येत नाही. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवला होता. याची दखल घेत उपकार्यकारी अभियंता राजेंद्र सूर्यवंशी यांनी घडल्या प्रकाराची चौकशी केली आहे. सर्वांचे मोबाईल सुरू ठेवा, नेटवर्क नसेल तर खासगी क्रमांकावर तत्काळ फोन क्रमांक वळता करून घ्या, असे आदेश दिले आहेत. यापुढे असा प्रकार घडता कामा नये, असे खडसावले. कोरोनाकाळात नागरिकांनी कार्यालयात येऊन तक्रार नोंद करण्यापेक्षा दूरध्वनीवरूनच तक्रारी घ्याव्यात, अशी मागणी होत आहे. ‘लोकमत’ने या प्रश्नाला वाचा फोडल्याने आभार मानण्यात आले.

Web Title: Borgaon power workers slapped by officials