राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पुस्तकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST2021-04-16T04:26:45+5:302021-04-16T04:26:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने येथील ज्ञानप्रबोधिनी वाचनालयास निवडक पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष ...

Book gift from Nationalist Welfare Trust | राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पुस्तकांची भेट

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पुस्तकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने येथील ज्ञानप्रबोधिनी वाचनालयास निवडक पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते हा पुस्तकांचा संच वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी राज्य सरचिटणीस भीमराव पाटील, तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, संजय पाटील, खंडेराव जाधव, इलियास पिरजादे, ग्रंथपाल विनोद ठोंबरे उपस्थित होते.

खा. पवार उत्तम वाचक असून, राज्यात वाचन चळवळ वाढायला हवी, हा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने राज्यातील १०० ग्रंथालयांना निवडक व वाचनीय पुस्तकांचा संच भेट दिला आहे. त्यातील एक ज्ञानप्रबोधिनी वाचनालयास देण्यात आला.

Web Title: Book gift from Nationalist Welfare Trust