राजेश नाईक फौंडेशनच्यावतीने पुस्तक बँकेला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:28+5:302021-02-05T07:29:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्यावतीने सुरू केलेल्या पुस्तक बँक अभियानास राजेश नाईक फौंडेशन वाचनालयाच्यावतीने १०१ पुस्तके भेट ...

राजेश नाईक फौंडेशनच्यावतीने पुस्तक बँकेला मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्यावतीने सुरू केलेल्या पुस्तक बँक अभियानास राजेश नाईक फौंडेशन वाचनालयाच्यावतीने १०१ पुस्तके भेट देण्यात आली. आयुक्त नितीन कापडणीस यांनी ही पुस्तके स्वीकारली.
महापालिका आयुक्त कापडणीस यांच्या पुढाकाराने पुस्तक बँक ही संकल्पना राबविली जात आहे. यासाठी जुनी पुस्तके भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्याला राजेश नाईक फौंडेशनने प्रतिसाद दिला. फौंडेशनच्यावतीने १०१ पुस्तके आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक राजेश नाईक यांच्याहस्ते दिव्यांग सुरेश भंडारे यांना सायकल भेट देण्यात आली. तसेच फौंडेशनचे अध्यक्ष संदीप आपटे यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी शामराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर संदीप आपटे यांनी आभार मानले. यावेळी दत्तात्रय मुळीक, शामराव शिंदे, नंदकुमार कारंडे, अशोक मुळीक, नंदकुमार मुळीक, मधुकर सूर्यवंशी, प्रभाकर घोरपडे, जितुभाई शहा, दिलीप पाटील, विश्वास माने, सुनील भिसे, उदय नाईक, राहुल मुळीक, विश्वास केसरे, दीपक ताटे, अमित मुळीक, दीपक कळंबकर, विनायक कलगुटगी, रोहित मुळीक, अमोल शिंदे, व्यंकटेश नाईक, नीरज नाईक, स्वप्निल वास्कर उपस्थित होते.