बोकड चोराकडून दोन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:32 IST2021-09-07T04:32:48+5:302021-09-07T04:32:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : कदमवाडी-उपवळे (ता. शिराळा) येथील बोकड चोरीचा छडा लावत असताना बोकडाबरोबरच दोन चोरीच्या मोटारसायकलीही चोरट्यांकडून ...

Bokad seized two stolen motorcycles from the thief | बोकड चोराकडून दोन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत

बोकड चोराकडून दोन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : कदमवाडी-उपवळे (ता. शिराळा) येथील बोकड चोरीचा छडा लावत असताना बोकडाबरोबरच दोन चोरीच्या मोटारसायकलीही चोरट्यांकडून शिराळा पोलिसांनी हस्तगत केल्या. संशयित विजय उत्तम कदम (वय २४, रा. कदमवाडी) व किरण बाबासाहेब सोनावडे (३२, रा. येडेमच्छिन्द्र, सध्या रा. प्रोफेसर कॉलनी, शिराळा) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, राहुल प्रकाश कदम यांच्या शेडमधून अज्ञात चोरट्यानी दि. ३ रात्री १० ते दि. ४ सकाळी ६ च्या दरम्यान २० हजार रुपये किमतीचे दीड वर्षाचे बोकड चोरून नेले होते. याबाबत तपास सुरू असताना बोकड हुबालवाडी येथे असल्याची माहिती मिळाली. यावरून हे बोकड ताब्यात घेण्यात आले. याचदरम्यान विनानंबरची मोटारसायकल फिरताना दिसली असता, त्याबाबत चौकशी केली. यावेळी संशयित विजय कदम व किरण सोनावडे या दोघांकडे प्रत्येकी एक अशा दोन चोरीच्या मोटारसायकली मिळाल्या. या मोटारसायकल कुरळप व शाळशी (बांबवडे, ता. शाहूवाडी) येथून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली कालिदास गावडे, नितीन यादव, नितीन सुतार, अभिजित पवार यांनी या चोरीचा छडा लावला.

Web Title: Bokad seized two stolen motorcycles from the thief