शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत बोगस मतदान, विरोधी उमेदवाराचा दोन मतांनी निसटता पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 18:24 IST

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग १० मध्ये ७ मृत व्यक्तीच्या नावे बोगस मतदान झाल्याने व प्रभाग १६ मध्ये ...

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग १० मध्ये ७ मृत व्यक्तीच्या नावे बोगस मतदान झाल्याने व प्रभाग १६ मध्ये मृत, दुबार, चुकीचे असे १३ बनावट मतदान झाल्याने शेतकरी विकास आघाडी व आरपीआयच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला.त्यामुळे तेथे निवडून आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करावी, यासाठी जिल्हा न्यायालयात पराभूत उमेदवारांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ॲड. अमित शिंदे यांनी सोमवारी दिली.तक्रारदारांचे वकील ॲड. शिंदे म्हणाले की, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये शेतकरी विकास आघाडीतर्फे उमेदवारी करणाऱ्या उदय शिवाजीराव शिंदे यांनी निवडून आलेले उमेदवार अब्दुलहमीद ब्रदुद्दीन शिरोळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रभागात सात मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी केली नसल्याचा गैरफायदा घेऊन सात मृत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झाले आहे. 

ही बनावट सात मते मिळाल्यामुळे शिरोळकर विजयी झाले आहेत. शिंदे यांचा केवळ दोन मतांनी निसटता पराभव झाला आहे. या मृत मतदानामध्ये निवडून आलेले उमेदवार शिरोळकर यांचे मृत वडील व दोन चुलते यांच्या नावाने देखील बनावट मतदान झाले आहे.ज्या मृत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झाले आहे, त्यांच्या मुलांनी न्यायालयामध्ये शपथपत्र देऊन उदय शिंदे यांच्या म्हणण्याला पुष्टी दिली आहे. त्यामुळे प्रभाग १० ची निवडणूक रद्द होऊन शेतकरी विकास आघाडीचे उदय शिंदे यांची विजयी उमेदवार म्हणून घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीVotingमतदानElectionनिवडणूक