येळावीतील बोगस प्रस्ताव; जिल्हा परिषद जबाबदार

By Admin | Updated: July 25, 2014 23:37 IST2014-07-25T23:02:35+5:302014-07-25T23:37:44+5:30

यादीतील मृत नावे जि. प. कृषी विभागात समावेश झाल्याचे स्पष्ट

Bogus proposal; District Council responsible | येळावीतील बोगस प्रस्ताव; जिल्हा परिषद जबाबदार

येळावीतील बोगस प्रस्ताव; जिल्हा परिषद जबाबदार

सांगली : येळावी (ता. तासगाव) येथील मृत लाभार्थींच्या नावे बोगस लाभ घेतल्याप्रकरणी तासगाव पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली होती. पण, या घोटाळ्यास जिल्हा परिषद कृषी विभागच दोषी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.येळावी येथील लक्ष्मण कांबळे आणि मुरलीधर भंडारे हे मृत असताना त्यांना विशेष घटक योजनेचा लाभ दिला होता. या प्रकरणाच्या चौकशीत पंचायत समितीमधील कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. पण, यादीतील मृत नावे जि. प. कृषी विभागात समावेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे, तर बारा नावांचा जिल्हा परिषदेत यादी आल्यानंतर समावेश झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bogus proposal; District Council responsible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.