शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

सांगलीत जुन्या रेकॉर्डमध्ये सापडताहेत बोगस कुणबी नोंदी, मोडी लिपीमध्ये खाडाखोड

By संतोष भिसे | Updated: November 25, 2023 13:36 IST

कुणबी मान्य; कुळवाडी, कुह्रवाडीचे काय?

संतोष भिसे

सांगली : कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासन सव्वाशे वर्षांपासूनच्या नोंदी धुंडाळत आहे. यादरम्यान काही बोगस नोंदीही सापडत आहेत.जिल्हा प्रशासन १८८० पासून १९६७ पर्यंतचे दप्तर तपासत आहे. साधारणत: १९२० पासून पुढे देवनागरीत, तर तत्पूर्वी मोडी लिपीमध्ये नोंदी आहेत. मोडी नोंदी पडताळण्यासाठी ‘कुणबी’ या शब्दाचा मोडी नमुना प्रशासनाने सर्व कार्यालयांना पाठविला आहे. त्यानुसार विविध कार्यालयांत कर्मचारी दप्तर तपासत आहेत. काही ठिकाणी मोडी जाणकारांचीही मदत घेतली आहे.या तपासणीमध्ये मोडीतील बोगस नोंदी सापडत आहेत. १९६७ पूर्वीच्या दप्तरात नोंदी केल्या आहेत. तत्कालीन गावकुलकर्णी किंवा गावकारभाऱ्यांनी सराईत मोडीमध्ये नोंदी केल्या होत्या. पण, पुढे बनवेगिरी करताना बाळबोध पद्धतीने ‘कुणबी’ अशी नोंद केली आहे. काही ठिकाणी खाडाखोड केली आहे. काही ठिकाणी ‘मराठा’ समोर ‘कुणबी’ असा विस्तार लिहिला आहे. काही ठिकाणी नव्याने कोरी पाने जोडून नवी नावे घुसडली आहेत.

अशी केली बोगसगिरीप्रत्येक रजिस्टरमध्ये नोंदी संपल्यानंतर शेवटी काही कोरी पाने शिल्लक असतात. ती फाडून मध्येच चिकटविली आहेत. त्यावर मोडीमध्ये बोगस नोंदी लिहिल्या आहेत. आपल्या नावापुढे कुणबी नोंद केली आहे. शंका येऊ नये म्हणून या पानांवर मध्येमध्ये अन्य जातीची, धर्माची नावेही नोंदविली आहेत. मोडीच्या जाणकारांना शोधमोहिमेदरम्यान ही बनवेगिरी लक्षात येत आहे. या बनावट कुणबींनी इतर मागास प्रवर्गातून सरकारी नोकऱ्या मिळविल्या आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेतही या नोंदी पुरावा स्वरूपात सादर केल्या गेल्या आहेत.

कुणबी मान्य; कुळवाडी, कुह्रवाडीचे काय?ब्रिटिश आणि संस्थानिक काळात कुणबीसाठी कुळवाडी तसेच कुह्रवाडी हा शब्दही प्रचलित होता. त्यामुळे काही ठिकाणी कुणबी, काही ठिकाणी कुळवाडी, तर काही ठिकाणी कुह्रवाडी अशा नोंदी आहेत. शासनाने कुणबी नोंदींना मान्यता दिली आहे. कुळवाडी आणि कुह्रवाडीचे काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. नोंद असूनही कुळवाडी मराठे ओबीसी समावेशापासून वंचित राहणार आहेत.

इस्लामपूर, विटा, तासगाव अपडेटइस्लामपूर, तासगाव, विटा, आष्टा नगरपालिकांमध्ये जुने रेकार्डही सुस्थितीत आहे. झीरो पेन्डन्सी मोहिमेतही ते सांभाळण्याची दक्षता प्रशासनाने घेतली. त्याचा फायदा आता कुणबी नोंदी शोधण्यामध्ये होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण