खरसुंडीतील विहिरीत तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:44+5:302021-08-27T04:29:44+5:30

खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे विहिरीत दत्तात्रय प्रल्हाद पुजारी (वय ३८) या तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून ...

The body of a young man in a well in Kharsundi | खरसुंडीतील विहिरीत तरुणाचा मृतदेह

खरसुंडीतील विहिरीत तरुणाचा मृतदेह

खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे विहिरीत दत्तात्रय प्रल्हाद पुजारी (वय ३८) या तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. पोलिसांनी मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला. पंचनामा करून शवविच्छेदनानंतर दुपारी अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दत्तात्रय पुजारी मंगळवारी सकाळी जनावरे चारण्यासाठी चिंचाळे हद्दीतील रानात गेला होता. अकराच्या दरम्यान जनावरे तिथेच बांधून जेवण्यासाठी घरी आला. जेवण करून दुपारी घरातून बाहेर गेल्यानंतर परत आलाच नाही. गुरुवारी सकाळी पडक्या विहिरीत त्याचा मृतदेह सापडला. त्याला पोहता येत नव्हते. तो विहिरीकडे का गेला, हा घातपात की अपघात, याची माहिती पोलीस घेत आहेत. आटपाडीचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, नारायण गरळे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.

Web Title: The body of a young man in a well in Kharsundi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.