बिळूरच्या तरुणाचा सांगलीत मृतदेह

By Admin | Updated: June 16, 2014 12:10 IST2014-06-16T12:10:40+5:302014-06-16T12:10:40+5:30

सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील शवागृहात गेल्या चार दिवसांपासून बेवारस अवस्थेत पडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे.

The body of the young man of Bilur | बिळूरच्या तरुणाचा सांगलीत मृतदेह

बिळूरच्या तरुणाचा सांगलीत मृतदेह

 

 
सांगली : सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील शवागृहात गेल्या चार दिवसांपासून बेवारस अवस्थेत पडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे. गुरुबसू तुळजाप्पा कोळी (वय २८, रा. बिळूर, ता. जत) असे त्याचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी तो सांगलीच्या मुख्य बसस्थानकातून गायब झाला होता.
कोळी गेल्या काही महिन्यांपासून आजारी होता. औषधोपचारासाठी त्याला घेऊन नातेवाईक ११ जूनला (बुधवार) सांगलीत आले होते. औषधे घेतल्यानंतर ते बिळूरला जाण्यासाठी सांगलीच्या बसस्थानकावर आले होते. दरम्यान, कोळीने नातेवाईकांची नजर चुकवून तेथून पलायन केले होते. त्याचा शहरात शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही. आज सकाळी तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यासाठी नातेवाईक सांगली शहर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार एम. डी. पाटील यांनी त्याचा फोटो पाहून, चार दिवसांपूर्वी एक मृतदेह सापडला असून, शासकीय रुग्णालयातील शवागृहात तो बेवारस अवस्थेत पडून आहे, तो तुम्ही पाहून या, असे सांगितले. नातेवाईकांनी मृतदेह ओळखला. चार दिवसांपूर्वी धामणी रस्त्यावर कोळीचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाची ओळख पटेल असे काहीच सापडले नाही. काही धागदोरे सापडले नव्हते. (प्रतिनिधी)

Web Title: The body of the young man of Bilur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.