कुंभारीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:20 IST2021-06-05T04:20:21+5:302021-06-05T04:20:21+5:30

जत : कुंभारी (ता. जत‌) येथील वयोवृद्ध लक्ष्मी शंकर माळी (वय ९५, रा. माळी वस्ती, कुंभारी) यांचा मृतदेह‌ ...

The body of an old woman was found in the pottery | कुंभारीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला

कुंभारीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला

जत : कुंभारी (ता. जत‌) येथील वयोवृद्ध लक्ष्मी शंकर माळी (वय ९५, रा. माळी वस्ती, कुंभारी) यांचा मृतदेह‌ मोडक बंधाऱ्यात आढळला. दोन दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा महादेव शंकर माळी यांनी लक्ष्मी माळी या हरविल्याची तक्रार पोलिसात दिली होती. गुरुवारी सकाळी लक्ष्मी यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. वृद्ध मयत लक्ष्मी माळी या तीन दिवसांपासून घरातून निघून गेल्या होत्या. त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. तीन दिवसांपूर्वी त्या पाण्यात पडल्या असाव्यात, असा अंदाज वर्तविला जात आहे.

पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून विच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, लक्ष्मी पाण्यात कशा पडल्या, याबाबत नेमकी माहिती कळू शकली नाही.

Web Title: The body of an old woman was found in the pottery