सांगलीत तडीपार गुंडाचा निर्घृण खून

By Admin | Updated: May 2, 2017 04:46 IST2017-05-02T04:46:36+5:302017-05-02T04:46:36+5:30

सहा महिन्यांपूर्वी तडीपार केलेल्या रवींद्र माने (३३) या गुंडाचा पाठलाग करून निर्घृण खून करण्यात आला. माधवनगर

The bloody murder of Sangliyat gang | सांगलीत तडीपार गुंडाचा निर्घृण खून

सांगलीत तडीपार गुंडाचा निर्घृण खून

सांगली : सहा महिन्यांपूर्वी तडीपार केलेल्या रवींद्र माने (३३) या गुंडाचा पाठलाग करून निर्घृण खून करण्यात आला. माधवनगर रस्त्यावरील कलानगर येथील दत्त मंदिराजवळ रविवारी भरदिवसा अडीच वाजता ही थरारक घटना घडली.
संशयित हल्लेखोरांनी कोयत्याने डोके ठेचल्याने रवींद्र काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचा मित्र भोराप्पा आमटे याच्यावरही संशयितांनी हल्ला केल्याने तो
जखमी झाला आहे. मोटारीची
धडक बसल्याने रवींद्र व भोराप्पा दुचाकीवरून उडून रस्त्याकडेला  एका रिकाम्या प्लॉटमध्ये पडले. त्यानंतर धडक देणाऱ्या मोटारीतून चार ते पाच संशयित उतरले.  त्यांनी रवींद्रवर सत्तूरने हल्ला चढविला. (प्रतिनिधी)

Web Title: The bloody murder of Sangliyat gang