शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताचा रिपोर्ट हाताने अन् एक्स-रे मोबाईलवर; शासकीय रुग्णालयातील अजब कारभार

By अविनाश कोळी | Updated: October 31, 2022 16:06 IST

ईसीजी, एक्स-रेचे निरीक्षण हाताने नोंदवायचे अन् डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्यांसाठी कित्येक तास रांगेत ताटकळत थांबायचे, असे प्रकार सध्या राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात सुरू आहेत

अविनाश कोळी

सांगली: केसपेपरच्या चिटकोऱ्यावर संपूर्ण रक्ताचा अहवाल लिहायचा... ईसीजी, एक्स-रेचे निरीक्षण हाताने नोंदवायचे अन् डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्यांसाठी कित्येक तास रांगेत ताटकळत थांबायचे, असे प्रकार सध्या राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात सुरू आहेत. चार महिन्यांपासून ही रुग्णालये ऑफलाइन झाल्याने राज्यभर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरू आहेत.

डिजिटल इंडिया अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये ऑनलाइन कारभार करत असताना जुलै २०२२मध्ये एका रात्रीत अचानक संबंधित एजन्सीला काम बंद करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. तेव्हापासून गेले चार महिने रुग्णालयातील कामकाज ऑफलाइन झाल्याने केस पेपरपासून विविध वैद्यकीय अहवालही हाताने लिहून देण्याची वेळ डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर आली आहे.

आरोग्य व्यवस्थापन व माहिती प्रणाली (एचएमआयएस)ची अंमलबजावणी राज्यात अनेक वर्षांपासून सुरू होती. एका खासगी एजन्सीमार्फत त्याचे काम केले जात होते. केसपेपरपासून विविध वैद्यकीय चाचण्या, अहवाल ऑनलाइन करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णसेवा गतिमान झाली होती. रुग्णांना रांगेत फार काळ ताटकळत बसावे लागत नव्हते. मात्र, अचानक आरोग्य विभागाने ही प्रणाली बंद केली. त्याचे कारण कोणत्याही रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना माहीत झाले नाही. संगणकीय प्रणाली बंद करून त्यावरील कंत्राटी कर्मचारी चार महिन्यांपूर्वी निघून गेले. त्यामुळे गेले चार महिने हा गोंधळ व रुग्णांचे हाल सुरू आहेत.

जुन्या अहवालांचे काय?

या ऑनलाइन प्रणालीत राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील लाखो रुग्णांचा डेटा, रुग्णालयातील माहिती, अहवाल, वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल, पत्रव्यवहार अशा सर्व गोष्टी अडकल्या आहेत. त्या परत मिळविणे कठीण झाले आहे.

या अडचणींमुळे रुग्ण हैराण

  • राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत रुग्णांचे वैद्यकीय अहवालही हाताने लिहावे लागताहेत.
  • एक्स-रे, ईसीजीचे निरीक्षण डॉक्टरांना हातानेच नोंदवावे लागत आहे.
  • ज्याठिकाणी एक्स-रे प्रिंटर बंद पडतो तिथे संगणकावरील चित्र मोबाइलवर घेऊन डॉक्टरांना दाखवावे लागते.
  • जे अहवाल तासात मिळायचे त्यांना आता दोन ते तीन दिवसाचा अवधी लागत आहे.
  • फिटनेस प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांना अनेक तास रांगेत थांबावे लागत आहे.
टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल