आष्ट्यात आज ‘लोकमत’ व जायन्ट्स ग्रुपतर्फे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:53+5:302021-07-04T04:18:53+5:30
आष्टा : ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारपासून रक्तदान महायज्ञाला सुरुवात झाली आहे. आष्टा ...

आष्ट्यात आज ‘लोकमत’ व जायन्ट्स ग्रुपतर्फे रक्तदान
आष्टा : ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारपासून रक्तदान महायज्ञाला सुरुवात झाली आहे. आष्टा येथे रविवार दि. ४ रोजी सकाळी १० ते दुपारपर्यंत या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
आष्टा-इस्लामपूर मार्गावरील वंजाळे हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे होणार आहे. जायन्ट्स ग्रुप ऑफ आष्टाचे अध्यक्ष समीर गायकवाड, डॉ. मनोहर कबाडे, डॉ. सतीश बापट, प्रकाश रुकडे, नितीन झंवर, सचिव प्रा. सूर्यकांत जुगदर, रुहानिया मदरसा मस्जिदचे अझरुद्दीन मुजावर, शिगाव येथील यश क्लासेसचे प्रा. भूषण भासर, सांगली जिल्हा नेहरू युवा फेडरेशनचे श्रेयश शिराळकर, सांगली जिल्हा नशाबंदी मंडळाचे सागर ढोले, डॉ. प्रवीण वंजाळे व जायन्ट्सचे पदाधिकारी संयोजन करत आहेत.
या शिबिराचे उद्घाटन आष्ट्याचे नायब तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, विराज शिंदे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन समीर गायकवाड यांनी केले आहे